शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
3
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
4
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
5
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
7
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
8
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
9
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
10
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
11
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
12
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
13
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
17
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
18
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
19
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
20
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

झेंडा कोणाचा?

By admin | Updated: February 23, 2017 05:16 IST

वीस वर्षे एकमेकांच्या नैसर्गिक मैत्रीचे गोडवे गाणाऱ्या शिवसेना आणि भाजपाने यंदाच्या

गौरीशंकर घाळे / मुंबईवीस वर्षे एकमेकांच्या नैसर्गिक मैत्रीचे गोडवे गाणाऱ्या शिवसेना आणि भाजपाने यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मात्र थेट एकमेकांचे कपडे उतरविण्याची भाषा केली. दोन ‘माजी’ मित्रांमधील या कलगीतुऱ्याने संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईच्या निकालांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच मुंबईकरांनी यंदा विक्रमी मतदान केल्याने सोशल मीडियापासून कॉर्पोरेट गप्पांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी ‘मुंबईचा बॉस कोण’ शिवसेना की भाजपा याचीच चर्चा रंगली आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबईकरांचा कौल स्पष्ट होईल. मुंबईकरांनी मंगळवारी विक्रमी मतदान करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. एरवी ४५ टक्क्यांपर्यंत घुटमळणारी मतांची टक्केवारी यंदा ५५ टक्क्यांवर गेली. २५ वर्षांतील सर्वोच्च मतदानाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांची धाकधूक मात्र वाढली आहे. मतदानोत्तर चाचण्यांमधूनही शिवसेना आणि भाजपात अटीतटीची झुंज असल्याचा अंदाज समोर आला आहे. सट्टाबाजारात शिवसेनेला पसंती मिळाली असली तरी भाजपाही तोडीसतोड असल्याचे मानले जात आहे. वाढीव मतदान नेहमी भाजपाच्या पारड्यात जाते असा समज आहे. त्यामुळे मतदानाची आकडेवारी समोर येताच, ही वाढीव अकरा टक्के मते आमचीच असल्याचा दावा भाजपाने केला. तर, जाणीवपूर्वक मराठी पट्टयातील मतदारांची नावे गाळण्यात आली, ११ लाख मतदारांची नावे गायब केली गेली, असा आरोप शिवसेना नेत्यांनी केला. निकालाबाबत पक्षीय पातळीवर परस्परविरोधी दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. मतदानाचा वाढलेला टक्का आपल्याला तारणार की मारणार याचा अंदाज घेण्यातच उमेदवारांचा आजचा दिवस संपला.मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यांमुळे भाजपाच्या गोटातील उत्साह प्रभागनिहाय टक्केवारीचे आकडे येईपर्यंत काहीसा ओसरला. बुधवारी तर भाजपा नेत्यांनी काहीसा सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. युतीमधील तणातणी नेमके काय वळण घेणार हे सर्वस्वी मुंबईच्या निकालांवर अवलंबून आहे. निवडणुकीआधी कपडे काढण्याची भाषा करणारे दोन्ही पक्ष निकालानंतर पुन्हा एकत्र येणार की वेगळ्या वाटेने जाणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मुंबईच्या निकालांचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार असल्याने त्यादृष्टीने राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू आहे. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना मिळणाऱ्या जागांमध्ये नेमके किती अंतर आहे, यावरच मुंबई आणि राज्यातील राजकारणाची दिशा ठरणार इतके मात्र नक्की. मतदान केंद्रावरील नियम मतदान केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मोबाइल, कॉर्डलेस वापरण्यास आणि खासगी वाहनांना बंदी आहे. तसेच कोणताही मजकूर लिहिण्यास किंवा छापील मजकूर प्रदर्शित करण्यासही बंदी घातली आहे. मतमोजणीच्या वेळी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, होमगार्ड, केंद्र व राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या आहेत. तसेच मतमोजणीच्या वेळी केंद्राबाहेर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार हे गृहीत धरून वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केला आहे. अनेक मतदान केंद्र असलेल्या परिसरात वाहनांना पार्किंग करण्यास देखील बंदी आहे. यंत्रणा सज्ज, सकाळी १० पासून मतमोजणीच्मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५५.५३ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. एकूण ९१ लाख ८० हजार ४९१ मतदारांपैकी ५० लाख ९७ हजार ५६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. आता याची मतमोजणी शहरासह उपनगरातील २३ मतमोजणी केंद्रांवर गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे.च्मतमोजणी केंद्रांसाठी लागणारी सर्व व्यवस्था तसेच अधिकारी, कर्मचारी वर्ग यापूर्वीच नियुक्त करण्यात आला आहे. सर्व २३ मतमोजणी केंद्रांवर सकाळी ६.३० वाजता मतमोजणी प्रतिनिधींच्या समक्ष ‘मॉक पोल’ घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत एकूण २ हजार २७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रत्यक्षपणे ९६६ कर्मचारी लागणार असून २३ निवडणूक निर्णय अधिकारी व २३ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच यासंबंधीची सांख्यिकी माहिती संकलित करण्यासाठी साधारणत: १३८ कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यक तो पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.कुर्ल्याचा पहिला तर अंधेरीचा निकाल शेवटीकुर्ला पश्चिम येथे सर्वांत कमी १० टेबल आहेत. याठिकाणी आठ वॉर्डांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कुर्ल्याचा निकाल पहिला घोषित होऊ शकतो. अंधेरी येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक ९१ टेबल असून, त्याठिकाणी १३ वॉर्डांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे अंधेरीतील निकाल सगळ्यात उशिरा घोषित होणार आहे. शिवसेनाच ठाणेदार?शिवसेनेच्या सत्तेशी जवळचे नाते असलेल्या ठाण्याची सत्ता तो पक्ष बहुमताने राखणार का किंवा किती जादा जागांची बेगमी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पाडून पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांना त्यांच्या टीमसह पक्षात घेतल्याचा भाजपाला उल्हासनगरमध्ये कितपत फायदा होतो, याकडे हेही निकालातून स्पष्ट होईल. सकाळी १० वाजता सुरू होईल आणि पंधरा मिनिटांत निकाल हाती येतील, असा अंदाज आहे.ठाण्यात ३२ प्रभागांतून १३१, तर उल्हासनगरला २० प्रभागांतून ७८ नगरसेवक निवडले जाणार आहेत.सकाळी १० वाजता सुरू होईल आणि पंधरा मिनिटांत निकाल हाती येतील, असा अंदाज आहे.ठाण्यात ३२ प्रभागांतून १३१, तर उल्हासनगरला २० प्रभागांतून ७८ नगरसेवक निवडले जाणार आहेत.मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होईल आणि बहुतेक निकाल दुपारी १ पर्यंत हाती येतील, अशी शक्यता आहे. मतमोजणीसाठी राज्यभरात संपूर्ण प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक क्षेत्रांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मतांची टक्केवारी व जागाशिवसेनावर्ष मिळालेली मतेजागा २०१२२१.५८%७५२००७२२.७१%८४२००२२८.१०%९८भाजपा वर्ष मिळालेली मतेजागा २०१२८.६४%३०२००७८.६८%२८२००२९.०६%३५काँग्रेसवर्ष मिळालेली मतेजागा २०१२२१.२३%५२२००७२६.३०%७१२००२२६.४८%६१राष्ट्रवादी वर्ष मिळालेली मतेजागा २०१२६.५६%१३२००७११.२९%१४२००२१२.६६%१२मनसेवर्ष मिळालेली मतेजागा २०१२२०.६७%२८२००७१०.४३%०७निकालाची लाइव्ह बित्तंबातमी लोकमतच्या वेबसाइटवरमहापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांच्या निकालाची बित्तंबातमी वेबसाइटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत लाइव्ह पोहोचवण्यासाठी लोकमतची टीम सज्ज झाली आहे. सगळ्यांच्या आधी ताजे अपडेट जाणून घ्या www.lokmat.com