शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करणारे 'ते' दांपत्य पोलिस दलातून निलंबित

By admin | Updated: November 17, 2016 13:36 IST

जगातील सर्वोच्च 'माऊंट एव्हरेस्ट शिखर' सर केल्याचा दावा करणा-या पुण्यातील दिनेश व तारकेश्वरी राठोड यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ - जगातील सर्वोच्च 'माऊंट एव्हरेस्ट शिखर' सर केल्याचा दावा करणा-या पुण्यातील पोलीस दांपत्य दिनेश व तारकेश्वरी राठोड या दोघांनाही पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र या दांपत्याची खात्यांतर्गत चौकशी सुरुच राहणार आहे. यापूर्वी नेपाळ सरकारने त्यांच्यावर १० वर्षांची बंदी घातली होती. राठोड दांपत्याने एव्हरेस्ट शिखर केल्याचा खोटा दावा केला असून खोटी माहिती दिल्याचे सांगत नेपाळ सरकारने त्यांच्याविरोधात ही कारवाई केली होती. 
 
('एव्हरेस्ट' सर केल्याचा खोटा दावा करणा-या पुण्यातील दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांची बंदी)
(VIDEO : अकलुजच्या निहालची आता एव्हरेस्ट शिखरावर नजर)
(पहिल्या ‘एव्हरेस्ट’वीर महिलेचे निधन)
शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात दिनेश टी. राठोड (३०) व तारकेश्वरी भालेराव -राठोड (३०) हे कार्यरत होते. २००६ साली ते शहर पोलिस दलात रूजू झाले. तारकेश्वरी या राष्ट्रीय फुटबॉलपटू असून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटेपटू आहेत. तर दिनेश हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे व किकबॉक्सिंगपटू आहेत. या दोघांचा २००८ साली प्रेमविवाह झाला. आपल्या एव्हरेस्टच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. दुस-या प्रयत्नात जून महिन्यात आपण हे शिखर सर केल्याचा दावा त्यांनी केला होता, तसेच एव्हरेस्टवरील काही फोटोही शेअर केले. 
मात्र त्यांचा हा दावा खोटा असून त्यांनी एव्हरेस्टवर कोणतीही चढाई केलेली नव्हती. तसेच पुण्यातील एका फोटोग्राफरकडून त्यांनी मॉर्फ केलेले (नकली) फोटो सादर केल्याचे उघड झाले होते.  एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल सादर करण्यात आलेली कागदपत्रेही खरी नसून ती बनावट असल्याचे समोर आले असून नेपाळ सरकारने त्यांचे पितळ उघडे पाडत त्यांच्यावर बंदी घातली. हा प्रकार पोलिस दल व देशाची इमेज बिघडवणारा असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांनी म्हटले होते. या कारस्थाप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही शुक्लांनी दिले होते. पुणे पोलिसांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे या दोघांवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरुच राहणार आहे.