शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध निवडीनंतर उमेदवार नक्की कुणाचा..?

By admin | Updated: November 5, 2016 01:04 IST

राष्ट्रवादी व भाजपा दोन्ही पक्षांनी अपक्ष उमेदवार आमचाच म्हटल्याने एक वेगळेच राजकीय नाट्य आज बारामतीत रंगले.

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली खरी, परंतु नंतर मात्र राष्ट्रवादी व भाजपा दोन्ही पक्षांनी अपक्ष उमेदवार आमचाच म्हटल्याने एक वेगळेच राजकीय नाट्य आज बारामतीत रंगले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने धनंजय रामदास आंबुरे यांना हमाल मापाडी गटातून उमेदवारी दिली होती, तर भाजपाने विलास चौधर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, दोघांनी अपक्ष नितीन सरक यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. भाजपाने पहिल्यांंदाच राष्ट्रवादी कॉँग्रेसला आव्हान दिल्यानंतर उमेदवारी डावललेले, पण अपक्ष बिनविरोध निवडून आलेले नितीन सरक यांना ‘हे आमचेच’ म्हणण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि भाजपाने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने विद्यमान संचालक नितीन सरक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शेखर दाते, शिवसेनेचे राजेंद्र काळे, माजी नगराध्यक्ष सुनील पोटे आदींनी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्याकडे सरक यांच्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे आज विठ्ठल चौधर यांना त्यांनी माघार घेण्यास सांगितले. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय आंबुरे यांनीदेखील माघार घेतल्याने सरक यांची बिनविरोध निवड झाली. सरक यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडे अगोदर मागणी केली होती. >राष्ट्रवादी भवनात उडाली धांदल...इतर ५ बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबरोबर सरक यांनादेखील सत्कारासाठी राष्ट्रवादी भवनामध्ये बोलावण्यात आले. सत्काराचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ते तेथून नीरा कॅनॉल संघात दाखल झाले. सत्कारात नाव पुकारले तेव्हा ते जागेवर नव्हते. त्यामुळे अन्य पाच जणांचा सत्कार करण्यात आला. दरम्यानच्या काळात सरक यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर चांगलीच धांदल उडाली. >सरक नेमके कोणाचे..?बिनविरोध निवड झालेले नितीन शंकर सरक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला. धावपळ करून सरक यांना राष्ट्रवादी भवनात आणण्यात आले. इतर बिनविरोध उमेदवारांसमवेत त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, सरक हे विद्यमान संचालक आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत यादीतदेखील आंबुरे यांचेच नाव होते. मात्र, सरक निवडून आल्यावर ‘सरक आमचे अधिकृत उमेदवार होते,’ असे म्हणण्याची नामुष्की राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर ओढवली.