शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना द्वेषाने आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण?- एकनाथ शिंदे

By admin | Updated: May 28, 2017 17:53 IST

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून सर्व परवानग्या प्राप्त करून घेतल्यानंतर आज विटावा स्कायवॉकचं खरंखुरं भूमिपूजन भूमिपुत्रांच्या हस्ते होत आहे

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 28 - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून सर्व परवानग्या प्राप्त करून घेतल्यानंतर आज विटावा स्कायवॉकचं खरंखुरं भूमिपूजन भूमिपुत्रांच्या हस्ते होत आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय शिवसेना कधीही घेत नाही. शिवसेना द्वेषाने आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे, हे ठाणेकरांना माहिती आहे आणि जनताच या धृतराष्ट्राला त्याची जागा दाखवून देईल, असा टोला ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाणला.या कामासाठीचा कार्यादेश अवघ्या एका महिन्यांपूर्वी प्राप्त झाला असून त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. स्थानिक भूमिपुत्र पांडुरंग मढवी आणि पंढरीनाथ खारकर या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पूजा करून या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.आपणच हा प्रकल्प मंजूर करून घेऊन 2014 मध्येच याचं भूमिपूजन केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. मात्र, पालकमंत्री श्री शिंदे यांनी रविवारी गेल्या महिन्यात मिळालेल्या कार्यादेशाची प्रत दाखवून आव्हाडांची पुरती पोलखोल केली. कुठल्याही प्रकारच्या परवानग्या आणि कार्यादेश नसताना भूमिपूजन केलेच कसे, असा सवाल करून श्री शिंदे यांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना फसवण्याचेच काम काही नेते करतात, मात्र जनताच त्यांना धडा शिकवेल, अशी घणाघाती टीका केली.सुमारे 21 कोटी रुपयांच्या विटावा स्कायवॉकमुळे विटावा येथील रहिवाशांना थेट ठाणे स्थानकात सुरक्षितरीत्या जाण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. गेली तीन वर्षे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून या पुलासाठी आवश्यक असलेल्या वनखाते, ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय अशा विविध परवानग्या प्राप्त करून घेतल्या. त्यामुळे आता या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.याप्रसंगी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आ. रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपमहापौर रमाकांत मढवी, विभाग प्रमुख अविनाश पाटील, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.