मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षपदाचे पक्षाचे उमेदवार विजय औटी यांना मतदान करावे, असा व्हिप पक्षाने जारी केला आहे. मात्र त्याचवेळी औटी यांची उमेदवारी मागे घेण्याकरिता शिवसेना-भाजपाच्या राज्यातील नेत्यांमधील वाटाघाटी सुरू झाल्या असल्या, तरी निर्णयाची सर्व सूत्रे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या हाती असल्याने शिवसेनेच्या 1क् मंत्रिपदांच्या मागणीचे काय होणार, ते स्पष्ट नाही.
शिवसेनेच्या अनेक आमदारांमध्ये सत्ताधारी बाजूला बसण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र हीच बाब हेरून
उद्धव यांनी जोर्पयत सन्मानजनक तोडगा निघत नाही तोर्पयत कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षात बसायचे आहे आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, असे बजावले.
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करवून घेताना मात्र
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर
केलेली टीका आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्य़ापासून अनिल देसाई यांना दूर ठेवण्याचा निर्णय यामुळे शहा नाराज आहेत. शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला तर घ्या, मात्र त्यांच्या अटी मान्य करून पाठिंबा नको, असे शहा यांचे मत आहे.
राष्ट्रवादीला सोबत घेण्यासही आक्षेप
च्खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारामध्ये ज्या पक्षाचा ‘नॅचरली भ्रष्ट पार्टी’, असा उल्लेख केला होता त्या पक्षाचे सहकार्य घेणार का, असे टीकेचे सूर भाजपाच्या विरोधात उमटत आहेत. शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला तर या टीकेतून भाजपाला स्वत:चा बचाव करता येणार आहे. भाजपा-शिवसेना एकत्र येताना दिसत नाहीत. या पाश्र्वभूमीवर राज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी सरकारला पाठिंबा देणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र आता शिवसेना भाजपा सोबत गेली तर राष्ट्रवादी उद्या काय करते, याबाबत उत्सुकता आहे.
च्विधानसभा निवडणुकीत तुटलेली युती, प्रचारात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुखपत्र सामनाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेले प्रहार, निवडणूक निकालानंतरही कायम राहिलेली कटुता, राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेने सहभागी होण्यावरून निर्माण झालेला तणाव, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने झालेली तणातणी या सगळ्या पाश्र्वभूमीवर युती पूर्णत: तुटणार, असे बोलले जात असताना पुन्हा एकदा दोघे जवळ येताना दिसत आहेत.