शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

देशरक्षण करताना गावच्या विकासाचं स्वप्नं अधुरं

By admin | Updated: November 18, 2015 00:14 IST

शहीद संतोष... तुझे सलाम : पोगरवाडीच्या भल्यासाठी पुढच्या महिन्यात घेतली जाणार होती गावकऱ्यांची बैठक

सातारा : अतिरेक्यांच्या गोळ्या छातीवर झेलत भारतमातेचं रक्षण करणाऱ्या शहीद संतोष महाडिकांचं एक स्वप्नं मात्र अधुरं राहिलं. त्यांना त्यांच्या पोगरवाडीचा विकास करायचा होता. त्यासाठी ते डिसेंबरमध्ये येऊन गावकऱ्यांची बैठकही घेणार होते. काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना तीन वर्षांपूर्वी शौर्यपदक मिळाले होते. ईशान्य भारतात त्यांच्या टीमने दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला होता. म्यान्यमार येथेही त्यांनी आपल्या धाडसाची चुणूक दाखविली होती. ते मूळचे पोगरवाडी येथील असून, आरे गावात ते दत्तक गेले होते. त्यांच्या वृत्ताने या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. सलग पाच वर्षे पोगरवाडीचे सरपंच असणाऱ्या मधुकर घोरपडे यांचे चिरंजीव संतोष यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. लष्करात दाखल झाल्यानंतर ‘मी देशाबरोबरच माझ्या गावासाठीही आयुष्यभर झटेन’ असे ते सतत बोलून दाखवत. त्यांची पत्नी उधमपूर येथे मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असून, त्याही मुलांसोबत बुधवारी साताऱ्यात येत आहेत. (प्रतिनिधी)पित्याचा वारसा चालवायचा होता...शहीद संतोष महाडिक यांचे वडील मधुकर घोरपडे हे पाच वर्षे सातारा तालुक्यातील पोगरवाडीचे सरपंच होते. खासदार उदयनराजे अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे या दोन्ही नेत्यांशी वडिलांचे चांगले संबंध होते. मात्र, सुमारे एक वर्षापूर्वी वडिलांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांनतरही घोरपडे घराण्याने नेतृत्त्वाची परंपरा पुढे चालू ठेवली. गेल्या आठवड्यातच संतोषच्या वहिनी शोभाताई जयवंत घोरपडे पोगरवाडीच्या सरपंच झाल्या आहेत. आयुष्यभर गावासाठी झटलेल्या वडिलांचा वारसा आपण पुढे चालविला पाहिजे, असे संतोष नेहमी घरातील मंडळींसमोर बोलून दाखवित असे; मात्र, देशरक्षण करताना गाव विकासाचे स्वप्न अधुरे राहिले.तीन दिवसांपूर्वीच संतोषचा आम्हाला काश्मिरहून घरी फोन आला होता. दिवाळीत येणे शक्य झाले नसले तरी डिसेंबरमध्ये सुट्या मिळणार आहेत, त्यावेळी किमान पंधरा दिवस तरी सातारा जिल्ह्यात मुक्काम करेन. तसेच आपलं गाव म्हणजे पोगरवाडीत सर्व गावकऱ्यांची एकत्र बैठक घेऊन गावच्या विकासासाठी एक चांगला आराखडा तयार करू. एकमेकांशी संघर्ष न करता गावचा विकास करण्यासाठी सर्वांची मानसिकता तयार करू, असे स्वप्नही संतोषने फोनवरून बोलताना आमच्यासमोर व्यक्त केले होते. - जयवंत घोरपडे, बंधू तीन दिवसांपूर्वीच संतोषचा आम्हाला काश्मिरहून घरी फोन आला होता. दिवाळीत येणे शक्य झाले नसले तरी डिसेंबरमध्ये सुट्या मिळणार आहेत, त्यावेळी किमान पंधरा दिवस तरी सातारा जिल्ह्यात मुक्काम करेन. तसेच आपलं गाव म्हणजे पोगरवाडीत सर्व गावकऱ्यांची एकत्र बैठक घेऊन गावच्या विकासासाठी एक चांगला आराखडा तयार करू. एकमेकांशी संघर्ष न करता गावचा विकास करण्यासाठी सर्वांची मानसिकता तयार करू, असे स्वप्नही संतोषने फोनवरून बोलताना आमच्यासमोर व्यक्त केले होते. - जयवंत घोरपडे, बंधू