शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गंमतीने फाशी दाखवताना पोलिसाचा जीव टांगणीला

By admin | Updated: June 27, 2016 21:42 IST

फाशी कशी घेतात याचे प्रात्यक्षिक गंमतीने पत्नीला दाखविणाऱ्या पोलिसालाच गळफास लागल्याची विचित्र घटना भांडुपमध्ये सोमवारी घडली. गोविंद बालाजी देवळे (२६) असे पोलिसाचे

- प्रकृती चिंताजनक

मुंबई : फाशी कशी घेतात याचे प्रात्यक्षिक गंमतीने पत्नीला दाखविणाऱ्या पोलिसालाच गळफास लागल्याची विचित्र घटना भांडुपमध्ये सोमवारी घडली. गोविंद बालाजी देवळे (२६) असे पोलिसाचे नाव असून तो सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अग्रवाल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.मुळचे बीड येथील रहिवासी असलेले देवळे यांची २०१४ सशस्त्र पोलीस दलात नेमणूक करण्यात आली. घाटकोपर भटवाडी येथील गोळीबार प्रशिक्षण केंद्रात ते पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षापासून पत्नी प्रियांका आणि ११ महिन्यांच्या मुलीसोबत ते भांडुप टेंभीपाडा परिसरात राहतात. अडीच हजार रुपये घरभाडे ते देत आहेत. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ते कामावरुन घरी परतले. बाहेर पाऊस सुरु असल्याने पत्नीने त्यांना घरात कपडे टाकण्यासाठी दोरी बांधण्यास सांगितले. सायंकाळी साडे चारच्या सुमारास घरात दोरी नसल्याने देवळेने पत्नीची नायलॉनच्या साडीचे एक टोक लोखंडी खांबाला बांधले. दुसरे टोक बांधत असताना देवळेने गंमत म्हणून कैद्याला फाशी कशी देतात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली. हीच गंमत त्यांच्या अंगलट आली. गळ्याभोवती त्यांनी साडीचे दुसरे टोक बांधले. आणि ही मस्ती सुरु असतानाच त्याचा पायाखालचा टेबल सरकला. गळ्याभोवती घेतलेला साडीचा फास आणखीन घट्ट झाला. क्षणात काय झाले हे पत्नीला समजलेच नाही. तिने तत्काळ मदतीसाठी शेजाऱ्यांकडे धाव घेतली. तेव्हा मदतीसाठी धावलेले घरमालक आणि स्थानिकांनी साडी कापून देवळेला तत्काळ अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. पोलीस नियंत्रण कक्षास देवळेंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सुरुवातीला स्थानिकांकडून मिळाली. ही माहिती मिळताच साडे सहाच्या सुमारास भांडुप पोलीस रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी देवळेंच्या पत्नीसह घरमालक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. तेव्हा वरील घटनाक्रम समोर आला. याची शहानिशा करत अधिक तपास तपास अधिकारी नितीन गिजे करत आहेत.