शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

...तर बजरंगी भाईजान ‘सरहद’ही पार करेल!

By admin | Updated: July 10, 2015 04:32 IST

देशभरात जोरदार चर्चा सुरू असलेला आणि ईदच्या दिवशी प्रदर्शित होत असलेला ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट ‘सरहद’पार म्हणजेच पाकिस्तानही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे

मुंबई : देशभरात जोरदार चर्चा सुरू असलेला आणि ईदच्या दिवशी प्रदर्शित होत असलेला ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट ‘सरहद’पार म्हणजेच पाकिस्तानही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मी स्वत: प्रयत्न करत असून, चित्रपटाची एक प्रत पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाकडेही पाठवल्याचे अभिनेता सलमान खानने खास ‘लोकमत’ला सांगितले. ‘लोकमत’च्या संपादकीय चमूसोबत त्याने अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्याने ‘बजरंगी भाईजान’ आणि भारतीय व पाकिस्तानी चित्रपटांबाबत आपले मत स्पष्ट शब्दांत मांडले. तो म्हणाला की, पाकिस्तानात भारतीय चित्रपटांचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. मग हा चित्रपट तिकडे प्रदर्शित होण्यात गैर काय? दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे सामने, एकमेकांच्या कलाकारांचे कार्यक्रम, इतर विषयांचे आदानप्रदान होते; तर मग सिनेमाच्या बाबतीतच का प्रश्नचिन्ह उभे केले जाते हे न समजणारे कोडे आहे. आपल्या सेन्सॉर बोर्डाप्रमाणे त्यांच्याकडेही सेन्सॉर बोर्ड आहे, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तपासून पाहिला जातोच; मात्र विनाकारण प्रत्येक चित्रपटाच्या वेळेस वाद उभे करणे चांगले नाही. चाहत्यांना चित्रपट हवे असतील तर त्यात वावगे काय, असा सवालही त्याने केला.ईदच्याच दिवशी तेथे ‘राँग नंबर’ आणि ‘बिन रोये’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘बजरंगी भाईजान’मुळे या चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चित्रपटासाठी ‘सरहद’पार प्रमोशन करण्याची आपली तयारी असल्याचेही त्याने स्पष्ट केले. ------------‘बजरंगी भाईजान’ या ‘लोकमत’ मीडिया पार्टनर असलेल्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान याने संपादकीय चमूशी अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा केली. या वेळी त्याने सोशल मीडिया, कलेचे आदानप्रदान आणि त्याचा मराठीशी असलेला संबंध यावर भाष्य केले.

सलमानसोबतचा सविस्तर संवाद उद्याच्या अंकात