शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भाषण करताना भास्कर जाधव रडले

By admin | Updated: October 12, 2014 22:50 IST

सापाला दूध पाजले तर त्याच्या तोंडातून अमृत थोडेच बाहेर पडणार आहे?

रत्नागिरी : सापाला दूध पाजले तर त्याच्या तोंडातून अमृत थोडेच बाहेर पडणार आहे? पक्षातीलच काही मंडळींनी हा साप पोसला होता. पक्षाने सर्व काही देऊनही गद्दारी करीत पक्षाबाहेर पडला व पक्षाच्या विरोधातच गरळ ओकला. त्यामुळे रत्नागिरीतील लढत ही गद्दार विरुध्द निष्ठावंत अशी असून, गद्दाराला एकदाच गाडून टाका, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या उदय सामंत यांच्यावर केला. राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस केशवराव भोसले, बाप्पा सावंत, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, उमेदवार बशीर मुर्तुझा, नगरसेवक सुदेश मयेकर, रामभाऊ गराटे, यासीन मामू आदी पदाधिकारी उपस्थित होते. जाधव म्हणाले, पक्षाने याला काय दिले नाही, दोनवेळा आमदारकी, राज्याच्या युवक शाखेचे प्रदेशाध्यक्षपद, मंत्रिपद देऊनही पक्षाशी गद्दारी केली. तिसऱ्यांदा उमेदवारी देऊनही पक्षाने पैसे मागितल्याचे सांगत बदनामी करणाऱ्याला त्याची जागा मतदारांनी दाखवून द्यावी. सांमत राष्ट्रवादीतून सेनेत गेल्यावर जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांना मी विचारले, जो राष्ट्रवादीचा, स्वत:च्या कुटुंबाचा होऊ शकला नाही, तो शिवसेनेचा होईल? त्यावर महाडिक म्हणाले, आम्ही त्यांना स्वीकारले आहेच, परंतु खांद्यावरही बसविले आहे. त्यावर मी म्हणालो, आमच्याकडे हेच झाले. काहींनी त्यांना खांद्यावर बसविले, त्यांचे कपडे घाण झाले. तुम्ही कान सांभाळा, असा सल्ला दिला आहे. मी पण २००४ मध्ये शिवसेना पक्ष सोडला होता. मला दिलेली उमेदवारी अचानक काढून घेतली. त्यामुळे मी पक्षाच्याच कार्यालयात बसून रितसर राजीनामा दिला होता. माझ्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही. येथे तर पक्षाने सर्वकाही दिले. तिसऱ्या वेळचा उमेदवारीचा एबी फॉर्मही दिला तरी गद्दारी झाली हे न पटणारेच आहे, असेही ते म्हणाले. पक्षाने अन्याय केला, उमेदवारीसाठी पैसे मागितले असे जर यांचे म्हणणे असेल तर हे भैरीबुवाचे क्षेत्र आहे. कोण खरा आणि कोण गद्दार याचा न्याय आपण भैरीबुवाकडेच सोपवूया, असे जाधव म्हणाले. (प्रतिनिधी) भाषण करताना भास्कर जाधव रडले पाच वर्षांपूर्वी पावसमध्ये राष्ट्रवादीची सभा झाली होती. त्यावेळी एकाच व्यासपीठावर असताना तटकरे मला उद्देशून बोलले होते की, माझ्या निष्ठेबाबतच त्यांनी संशय घेतला होता. त्यावेळी मी प्रचंड अस्वस्थ झालो. पवारांवर निष्ठा असलेल्या माझ्यावर असा आरोप भर सभेत व्हावा, हे दुर्दैवी होते. त्याचक्षणी मला वाटले पक्ष सोडावा. परंतु कुमार शेट्ये यांनी मला सावरले. मात्र, माझ्या निष्ठेबद्दल शंका घेणाऱ्यांची निष्ठा खरी की, माझी खरी, हे स्वामी स्वरुपानंद व शारदादेवीवरच सोपवले. मी गद्दार असेन तर मला शिक्षा व्हावी, जर दुसरा कोणी असेल तो जगासमोर येऊदे. २६ सप्टेंबर २०१४ रोजी गद्दार कोण हे जगासमोर आलेच. पालकमंत्रीपदाच्या माझ्या साडेतीन वर्षांच्या काळात या माणसाने विरोधकांशी हातमिळवणी करीत मला प्रचंड त्रास दिला, असे म्हणत भास्कर जाधव ओक्साबोक्सी रडले. त्यामुळे भावविवश झालेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच जोरदार घोषणाबाजी केली.