नाशिक : सिंहस्थ पर्वणी अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली असताना कुंभमेळ्यात बिबट्याच्या दर्शनाचा धोका उद्भावण्याची शक्यता वनविभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. कुंभमेळ्यात उघड्यावर मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ टाकले गेल्यास त्यावर ताव मारण्यासाठी कुत्र्यांच्या झुंडी येतात. कु त्र्यांना भक्ष्य बनविण्यासाठी बिबट्या कदाचित थेट कुं भमेळ्यात ‘दर्शन’ देऊ शकतो.नाशिकला लागून नगर जिल्ह्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. नाशिकमध्ये शेजारील जिल्ह्यातून बिबट्या आल्याची उदाहरणे आहेत. शहरात अनेकदा बिबटे आढळण्यामागे कुत्रे कारणीभूत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे बिबट्या भक्ष्याच्या शोधात शहराकडे वळू शकतो, असा अंदाज वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागतिक वन दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केला. तसेच महापालिका प्रशासनाने भाविकांनी रस्त्यावर फेकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याची सूचना वनविभागाने केली आहे. (प्रतिनिधी)‘रेस्क्यू टीम’ सज्ज कुंभमेळ्यादरम्यान बिबट्यांचा शहरात संचार होऊ शकतो, हे गृहित धरून वनविभागाने ‘रेस्क्यू टीम’ सज्ज ठेवली आहे.
कुं भमेळ्यात होणार बिबट्याचे दर्शन?
By admin | Updated: March 23, 2015 01:17 IST