शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या खेळाडूला मानाचे पदक?

By admin | Updated: March 27, 2016 01:12 IST

एके काळी सर्वच खेळांवर मुंबईची छाप असायची. आता मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच निमशहरी भागांतून येणारे खेळाडू जागतिक पातळीवर ठसा उमटवत आहेत. लोकमतच्या महाराष्ट्रीयन

चला, निवड करू या...मुंबई : एके काळी सर्वच खेळांवर मुंबईची छाप असायची. आता मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच निमशहरी भागांतून येणारे खेळाडू जागतिक पातळीवर ठसा उमटवत आहेत. लोकमतच्या महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कारासाठीच्या नामांकनामध्ये अक्षय अष्टपुत्रे, किसन तडवी, ललिता बाबर, प्रणव धनावडे, श्रद्धा घुले यांचा समावेश आहे. मात्र ज्युरी आणि लोकमतच्या वाचकांची मते यातूनच पसंतीचा विजेता ठरवला जाणार आहे.१) अक्षय अष्टपुत्रे, नाशिकराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमबाजीत दबदबा निर्माण करणाऱ्या या खेळाडूचा वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात चारदा समावेश झाला होता. २०१५मध्ये कुवेतमधील १३व्या आशियाई स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकावले. अक्षयने आतापर्यंत चार वेळा वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळविले आहे. २०१४मध्ये त्याने जर्मनीमधील म्यूनिक, अमेरिकेतील फोर्ड बेनिंग आणि मारीबोर येथे, तर २०१५मध्ये अझरबैजान येथे झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आॅलिम्पिक हे ध्येय ठेवून त्याची घोडदौड सुरू आहे. देशांतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने तो आॅलिम्पिकचे ध्येय साध्य करेल, असा त्याला विश्वास आहे. क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या शूटिंग रेंजवर गेलेल्या अक्षयने सहज म्हणून शूटिंग केले. त्याची नेमबाजी उत्तम असल्याचे दिसल्यानंतर त्यांचीही आवड वाढत गेली. पुढे तो महाराष्ट्र रायफल असोसिएशनमध्ये सहभागी झाला. २००९मध्ये मुंबई येथे राज्यस्तरीय स्पर्धेत तो सहभागी झाला. त्यात त्याने सुवर्णपदक मिळवले. २) किसन तडवी, नाशिकअंगभूत लवचीकता आणि कठोर परिश्रमाच्या बळावर नाशिकच्या वणीसारख्या दुर्गम भागातून उदयाला आलेला मॅरेथॉन विक्रमवीर म्हणजे किसन तडवी. भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रबोधिनीत मिळालेल्या प्रोत्साहनामुळे वर्ल्ड युथ गेम्समध्ये सहावे स्थान, दोहा येथील युथ एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले. किसनने २०१५ साली राष्ट्रीय विक्रम केला. कोलंबियातील युथ गेम्समध्ये त्याने ३ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये ८ मिनिटे २५ सेकंद अशी वेळ घेत, जागतिक यादीत सहावा क्रमांक पटकावला. दोहा येथे झालेल्या युथ एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियशनशिप स्पर्धेत हीच वेळ नोंदवून त्याने सुवर्णपदक पटकावले. रांचीत झालेल्या स्पर्धेत ३ कि.मी.साठी याच वेळेची नोंद करून सुवर्णपदक पटकावले. इंटर स्कूल नॅशनल गेम्समध्ये ५ किलोमीटर अंतर १४ मिनिटे ४४ सेकंद वेळेत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. गोव्यातील युथ नॅशनल गेम्समध्ये ३ किलोमीटर अंतर ८ मिनिटे २३ सेकंदात पूर्ण केले.३) ललिता बाबर, कोल्हापूर, अ‍ॅथलिटब्राझीलमध्ये यंदा होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू म्हणजे ललिता बाबर. माणदेशी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ललिताच्या नावावर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ८ सुवर्णपदकांसह एकंदर २३ पदके आहेत. ८ सुवर्णपदकांशिवाय ६ रौप्य व ९ कांस्यपदकांचा समावेश आहे. ती माण तालुक्यातील. चीनमधील वुहानमध्ये झालेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये ९.३४.१३ वेळ नोंदवून आशियाई व राष्ट्रीय विक्रमासह तिने सुवर्णपदक मिळविले. २०१४मध्ये १७वी आशियाई स्पर्धा दक्षिण कोरियात झाली. तिथे तिने ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये कांस्यपदक मिळविले. २०१२पासून मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ती विजेतेपद मिळवित आहे. जानेवारी २०१५मधील स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. भारतीय आॅलिम्पिक असोसिएशन आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने २०११मध्ये ३ हजार मीटरमध्ये कांस्य, २०१५मध्ये ३ हजार मीटरमध्ये सुवर्णआणि ५ हजार मीटरमध्ये रौप्य अशी पदके मिळविली.४) प्रणव धनवडे, क्रिकेट, कल्याणक्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका १५वर्षीय खेळाडूने ३२९ चेंडूंत नाबाद १००९ धावा काढत, एका नव्या विक्रमाची नोंद केली. शाळकरी मुलाच्या खेळीने धावांच्या विक्रमाचे नवे शिखर तयार केले. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेत शिकणारा प्रणव रिक्षाचालकाचा मुलगा असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आणि त्याला शिष्यवृत्तीचा आधार मिळाला. त्याने दोन दिवस मैदानात ठोकलेला तळ, ३२७ चेंडूंना सामोरे जात १२९ चौकार आणि ५९ षटकारांची आतशबाजी केली. त्यातून १००९ धावांचा नाबाद पल्ला. सगळेच आश्चर्यकारक आणि अद्वितीय. हा राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरीलही विक्रम आहे. प्रणव १ हजार ९ धावांवर असताना प्रशिक्षक हरीश शर्मा यांनी डाव घोषित केला. यापूर्वीचे विक्रम ए.ई.जे. कॉलिन्स : नाबाद ६२८ धावा (वर्ष - १८९९) सी.जे. इडी : ६६४ धावा (वर्ष - १९०२) पृथ्वी शॉ : ५४६ (वर्ष - २०१४) डी. हवेवॉला : ५१५ (वर्ष - १९३४) ५) श्रद्धा भास्कर घुले, अकोले-नगरमैदान वा पोषक वातावरण नसताना प्रवराकाठच्या श्रद्धा घुलेच्या उडीने चमत्कार केला. युवा राष्ट्रकुल स्पर्धेत मिळालेले गोल्ड मेडल आणि सर्व पातळ्यांवर मिळून उंच व तिहेरी उडीत कमावलेल्या ६३ गोल्ड मेडल्समुळे तिला ‘सुवर्णकन्ये’चे बिरुद लाभले आणि २०१५चा शिवछत्रपती पुरस्कारही. श्रद्धाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ पातळीवर अ‍ॅथलेटिक्स खेळाडू म्हणून तिहेरी व उंचउडीत ६३ सुवर्ण, २४ रौप्य, २७ कांस्य अशी ११४ पदके पटकविली आहेत. महाराष्ट्रातील १८ वर्षे, २० वर्षे व महिला अ‍ॅथलेटिक म्हणून उंच व तिहेरी उडी क्रीडा प्रकारात सर्व विक्रमांची नोंद तिच्या नावावर आहे. यंदाच्या युथ एशियन गेम्ससाठी भारतीय संघात निवडली गेलेली पहिली खेळाडू म्हणूनही तिने लक्ष वेधले आहे. २००७ साली पुणे येथे युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिहेरी उडीत तिने अगोदरचे विक्रम मोडीत काढत १३.११ मीटर उडी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला. व्हिएतनाम येथील ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकाविले. २०११च्या रांची येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिच्या उडीला रौप्यपदक मिळाले.