शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय महाडिक पक्षात राहणार की नाही

By admin | Updated: February 28, 2017 01:05 IST

निर्णय घ्या; हसन मुश्रीफ यांचे आव्हान; भाजप उमेदवारांचा प्रचार करणे दुर्दैवी

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिका, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केला त्यावेळी डोळेझाक केली; पण जिल्हा परिषद निवडणुकीत तर त्यांनी थेट भाजपचाच प्रचार केला. त्यामुळे त्यांना खरोखरच पक्षात राहायचे आहे की नाही हे त्यांनी एकदा स्पष्टच करावे, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांना दिले. राष्ट्रवादीच्या नूतन जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोमवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी महाडिक यांच्याबद्दल रोखठोक भूमिका मांडली. देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून धनंजय महाडिक यांना निवडून आणले. त्यानंतर सातत्याने पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. महापालिका, नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात प्रचार केला. त्यावेळी डोळेझाक केली. जिल्हा परिषदेला ‘उत्तूर’वगळता एकाही ठिकाणी त्यांनी सभा घेतली नाही. उलट काही ठिकाणी भाजपचा छुपा प्रचार केला, हे दुर्दैवी आहे. यदाकदाचित लोकसभेला पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कसे राबायचे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ता उतरतो, त्यावेळी त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतो. अशावेळी दगाफटका झाला तर काळजाचे तुकडे तुकडे होतात. गेली तीन वर्षे बघतोय, आता वेळ आली आहे, त्यांनी पक्षात राहायचे की नाही याचा निर्णय घ्यावा, असेही मुश्रीफ म्हणाले. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, अनिल साळोखे उपस्थित होते.शेट्टी-खोत वादाने वेदनाराजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर मिळाला; पण सत्तेसाठी दोघांमध्ये भांडणे होणे हे चळवळीच्या दृष्टीने मारक आहे. शेट्टी यांचा घराणेशाहीचा विरोध बरोबर आहे. खोत यांनी मनावर घेणे योग्य नसून, शेतकरी म्हणून दोघांतील वादाने मनाला वेदना होत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. ‘युवक क्रांती’शी चर्चा नाहीचंदगडची युवक क्रांती आपल्याबरोबर राहणार का? यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, त्यांच्याशी अद्याप आपले बोलणे झालेले नाही. तक्रार केली असती तर.....धनंजय महाडिक यांच्याबद्दल अद्याप पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केलेल्या नाहीत. तक्रारी केल्या असत्या तर पवारसाहेब त्यांच्या कार्यक्रमाला आलेच नसते, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. समरजितराजेंचे कौतुकजिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल माहिती असतानाही समरजितसिंह घाटगेंनी आक्रमकपणे प्रचारयंत्रणा राबविली. त्यांचा शेवटपर्यंतचा उत्साह वाखाणण्यासारखा होता, असेही मुश्रीफ म्हणाले.शेट्टी-खोत वादाने वेदनाराजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर मिळाला; पण सत्तेसाठी दोघांमध्ये भांडणे होणे हे चळवळीच्या दृष्टीने मारक आहे. शेट्टी यांचा घराणेशाहीचा विरोध बरोबर आहे. खोत यांनी मनावर घेणे योग्य नसून, शेतकरी म्हणून दोघांतील वादाने मनाला वेदना होत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.