शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ सध्या आहे कुठे ?

By admin | Updated: January 29, 2017 22:16 IST

काँग्रेस भाजपासह सर्वच पक्षांतर्फे उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर न झाल्यामुळे उमेदवारांच्या मनातील घालमेल वाढीस लागली आहे

‘ती’ सध्या आहे कुठे ?
 
काँग्रेस-भाजपातील इच्छुकांसमोर प्रश्न : बैठकांचा जोर सुरूच
 
नागपूर : निवडणुकांचे पडघम वाजले...पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्जदेखील भरला...मुलाखतींमध्ये ‘इम्प्रेस’ करणारे सादरीकरणदेखील केले. मात्र काँग्रेस भाजपासह सर्वच पक्षांतर्फे उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर न झाल्यामुळे उमेदवारांच्या मनातील घालमेल वाढीस लागली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असताना मात्र इच्छुकांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे. ‘ती’ सध्या आहे कुठे ? 
भाजपाकडे तीन हजारांहून तर काँग्रेसकडे अकराशेहून अधिक इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज आले होते. यात प्रस्थापित नगरसेवकांसोबतच, पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता. ६ ते १४ जानेवारी या कालावधीत भाजपातर्फे  एकूण तीन हजार तीन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तर काँग्रेसच्या मुलाखती ८ ते १० जानेवारी या कालावधीत झाल्या.
मुलाखती झाल्यानंतर आता उमेदवारांची यादी कधीपर्यंत जाहीर होते याकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये विविध कयास लावण्यात येत आहेत. शिवाय विविध चर्चांनादेखील उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री या दोघांनीही भाजपाच्या बहुतांश उमेदवारांच्या नावाला हिरवा कंदील दाखविलेला आहे. तर काँग्रेस कमिटीतर्फेदेखील नावे जवळपास ‘फायनल’ करण्यात आली आहेत. मात्र तरीदेखील यादी जारी न झाल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
काँग्रेसची यादी २ तारखेला ?
शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांना यासंदर्भात विचारणा केली असता यादी योग्य वेळ आल्यावर जाहीर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन ते तीन दिवसांत पहिली यादी येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेसची यादीदेखील याच कालावधीत येण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारी रोजी यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
कोहळेंची गडकरींशी चर्चा
उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी शनिवारी रात्री भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत ठरविण्यात आलेली नावे रविवारी नितीन गडकरींकडे सादर करण्यात आली. विधानसभा निवडणूक प्रचाराचे व्यस्त वेळापत्रक असतानादेखील गडकरी नागपुरातील घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. ते सकाळी गुवाहाटीवरुन नागपूरला आले. दुपारी शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यासह काही पदाधिकाºयांनी गडकरींशी चर्चा केली. यात गडकरी यांनी काही सूचना दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.