शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पाऊस कुठे अडला ?

By admin | Updated: June 24, 2014 01:08 IST

जून महिना संपत आला तरी सक्रिय होऊनही मान्सून न बरसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. १ ते २३ जून दरम्यान सरासरी १४७.३३ मि.मी. पाऊस पडायला हवा होता.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी: निम्मा पाऊसही नाहीनागपूर: जून महिना संपत आला तरी सक्रिय होऊनही मान्सून न बरसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. १ ते २३ जून दरम्यान सरासरी १४७.३३ मि.मी. पाऊस पडायला हवा होता. प्रत्यक्षात ६४.११ मि.मी. पाऊस झाला. पावसाची ही तूट ५६.६१ टक्के आहे.यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊसही कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने जून महिन्यापूर्वीच वर्तविला होता. मान्सून उशिरा दाखल झाला खरा पण तो दाखल झाल्यावरही बरसत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. एरवी ७ जूनला मान्सून विदर्भात दाखल होतो. गेल्या वर्षी तो वेळेत दाखल झाला होता. आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. यंदा जून महिना संपत आला तरी विदर्भ कोरडाच आहे. खरीप हंगामासाठी शेत जमिनीची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात यामुळे आता आसव येण्याची वेळ आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या मान्सून कुठेच सक्रिय नाही. देशाच्या ईशान्य भागात थोडा पाऊस पडत असला तरी इतर भागात मात्र स्थिती कोरडीच आहे. मध्य भारतात आणि पर्यायाने विदर्भात पाऊस येण्यासाठी बंगालच्या खाडीत अनुकूल परिस्थिती नाही आणि ती नजीकच्या काळात निर्माण होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे पुढचा काळ शेतकरी आणि सर्वसामान्यांच्यादृष्टीने कठीण राहणार आहे.नागपूर विभागात सर्वसाधारणपणे १ ते २३ जून या दरम्यान १४७.३३ मि.मी. पाऊस पडतो. यावेळी या काळात फक्त ६४.४१ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ५६.६१ टक्के कमी पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात १३९.७९ मि.मी. पैकी ६९.६४ (सरासरीच्या ५० टक्के), वर्धा जिल्ह्यात १३७.७३ मि.मी.च्या तुलनेत ६०.६६ मि.मी. (सरासरीच्या ४४ टक्के), भंडारा जिल्ह्यात १४८.४३ मि.मी.च्या तुलनेत ५४.२९ मि.मी.(सरासरीच्या ३७ टक्के), गोंदिया जिल्ह्यात १४८.४३ मि.मी.च्या तुलनेत ८९.६३ मि.मी.(सरासरीच्या ५६ टक्के), चंद्रपूर जिल्ह्यात १४३ मि.मी.च्या तुलनेत ४७.०१ मि.मी. (सरासरीच्या ३३ टक्के) आणि गडचिरोली जिल्ह्यात १५६ मि.मी.च्या तुलनेत ६३,४३ मि.मी. (सरासरीच्या ४१ टक्के) पाऊस झाला आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी झालेल्या पावसामुळे विभागातील धरणांतील जलसाठा समाधानकारक आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर सध्याच परिणाम होण्याची शक्यता नाही. (प्रतिनिधी)