शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
3
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
4
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
5
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
6
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
7
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
8
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
9
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
10
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
11
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
12
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
13
वॉशिंग्टनमधील मराठी कला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५०० भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप 
14
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
15
"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव
16
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
17
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
18
Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक
19
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
20
आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा

हनीसिंग लपलाय कुठे ?

By admin | Updated: November 26, 2014 01:02 IST

वेगळ्या धाटणीच्या गाण्यांमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेला पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग एवढा लोकप्रिय आहे की, तो कोणत्या वेळी कोठे असेल याची माहिती योग्य माध्यमाने प्रयत्न केल्यास सहज मिळू शकते.

पोलीस हतबल : हायकोर्टात मांडली अपयशाची गाथानागपूर : वेगळ्या धाटणीच्या गाण्यांमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेला पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग एवढा लोकप्रिय आहे की, तो कोणत्या वेळी कोठे असेल याची माहिती योग्य माध्यमाने प्रयत्न केल्यास सहज मिळू शकते. परंतु, पाचपावली पोलिसांना हनीसिंग आकाशात लपलाय की पाताळात असा प्रश्न पडला आहे. पाचपावली पोलिसांचे पथक हनीसिंगला शोधण्यासाठी दिल्लीला गेले होते. तेथून ते रिकाम्या हाताने परतले आहे. आता त्यांनी मुंबई गाठली आहे. पोलिसांची ही हतबलता अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.अश्लील गाण्यांच्या प्रकरणात योग्य तपास सुरू नसल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाचपावली पोलिसांना फटकारले होते. यामुळे त्यांनी थेट हनीसिंगला गाठण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांनी मंगळवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात पोलिसांच्या कर्तबगारीपेक्षा हतबलताच जास्त झळकत आहे. हनीसिंगची विचारपूस करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सी. बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले आहे. पथकात कॉन्स्टेबल दिनेश व शंभूसिंग यांचा समावेश आहे. हनीसिंगच्या संकेतस्थळावरील पत्ता पाहून पोलीस पथक नवी दिल्लीला गेले. नवी दिल्लीत त्यांना हनीसिंगचे कायमचे घर व कार्यालय सापडले नाही. स्थानिक लोधी कॉलनी पोलिसांनी हनीसिंगचा व्यवस्थापक आशिष जैन यांचा मोबाईल क्रमांक (9814044124) दिला. या क्रमांकावर संपर्क साधला असता जैन यांनी सहकार्य केले नाही. संकेतस्थळावर हनीसिंगचा जो दूरध्वनी क्रमांक आहे तो बंद होता. हनीसिंगचे कायदेविषयक सल्लागार जोव्हान यांनी प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ई-मेल करण्याची सूचना केली. त्यानुसार २२ नोव्हेंबर रोजी ई-मेल पाठविण्यात आला. यानंतर जोव्हान यांच्याशी पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. आता पुढील चौकशीसाठी पोलीस पथकास मुंबईला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती निकम यांनी दिली. सरकारी वकील भारती डांगरे यांनी मुंबईतील तपासाची माहिती सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केल्यामुळे न्यायालयाने दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)काय आहे याचिकेतअश्लील गाणी गाणे, अश्लील गाण्यांच्या चित्रफिती व ध्वनीफिती काढणे या आरोपांखाली हनीसिंग व संबंधितांवर कडक कारवाई करण्यासाठी पाचपावली येथील व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. यावरून गेल्या २६ एप्रिल रोजी पाचपावली पोलिसांनी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. हनीसिंगच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत आहे. समाजात असंस्कृत वातावरण निर्माण होत आहे. त्याला अश्लील गाणी गाण्यापासून थांबविण्यात यावे, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.