शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुठे कारंजे, तर कुठे रांगा !

By admin | Updated: March 4, 2017 00:55 IST

फुरसुंगी ग्रामपंचायत हद्दीतील दोन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वेगवेगळी स्थिती पाहण्यास मिळत आहे.

फुरसुंगी : फुरसुंगी ग्रामपंचायत हद्दीतील दोन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वेगवेगळी स्थिती पाहण्यास मिळत आहे. तुकाईदर्शनमधील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या काम सुरू आहे. तेथे पाण्याचे कारंजे उडताना दिसते, तर ढमाळवाडीत पाण्यासाठी रांगा लागत आहेत.फुरसुंगी परिसरातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. या परिसराला ग्रामपंचायतीकडून पिण्याचे पाणी मिळत नाही. महापालिकेच्या टँकर व काही ठिकाणांहून जाणाऱ्या नळकोंडाळ्यांवर येथील नागरिक अवलंबून आहेत. तुकाईदर्शन परिसरात पालिकेतर्फे पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तेथे दिवसातून एक ते दोन तास पाणी येते. परंतु, ढमाळवाडीत पाणी टँकरनेच येत असते. तर, काही भागातील नागरिक येथील रेल्वेलाईनशेजारी असणाऱ्या नळकोंडाळ्यावर रांगा लावतात. दुपारी तीनच्या सुमारास येथे पाणी येते. कॅन ठेवून रांगा लावल्या जातात. सायकल, दुचाकी तसेच महिला डोक्यावर भांडी घेऊन पाणी घरी नेतात. (वार्ताहर)>दक्षता गरजेचीसध्या तुकाईदर्शनमधील अतंर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असताना पाण्याच्या पाईपलाईनचीही दुरुस्ती केली गेली. रस्त्याचे काँक्रिटीकरण करेपर्यंत ही पाईपलाईन उघड्यावरच राहणार आहे. रस्ता खोदल्याने पाईपलाईन पुन्हा जोडण्यात येणार आहे.सध्या पाण्यासाठी पाईप जोडण्यात येत आहेत; मात्र ते निघाल्यावर पाणी रस्त्यावरून वाहते. पाण्याबाबत नागरिक दक्षता घेत नाही. तर, ढमाळवाडीतील नागरिकांना पाण्याची तासन् तास वाट पाहावी लागते. पालिकेलगतची गावे महापालिकेत समाविष्ट कधी होणार आणि येथील नागरिकांचे प्रश्न कधी सुटणार, हा प्रश्न येथील नागरिकासमोर आहे.