शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

बिबट्या आला कुठून ? गूढ कायम

By admin | Updated: January 3, 2015 00:58 IST

प्रशिक्षण, साधने १५ दिवसांत मिळविणार...

कोल्हापूर : बिबट्या उसाच्या मळ्यातून आला, वाघबिळाकडून आला, कुणी आणून सोडला, की कुणाच्या ताब्यातून तो सुटला, अशा स्वरूपात आज, शुक्रवारी दिवसभर शहरात चर्चा सुरू होती. दोन पथके (टीम) तयार करून वनविभागाने बिबट्याच्या आगमनाची शोधमोहीम सुरू केली; पण त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे रुईकर कॉलनीत काल, गुरुवारी बिबट्या कुठून आला, याचे गूढ कायम राहिले.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काल रुईकर कॉलनीत चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नाने बिबट्याला जेरबंद करण्यात आले. मात्र, त्याला चांदोली अभयारण्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. रुईकर कॉलनीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात बिबट्या आला कुठून, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. आज दिवसभरदेखील बिबट्याच्या आगमनावरून विविध स्वरूपांतील तर्क-वितर्क व्यक्त करीत चर्चा सुरू होती. परिसरातील उसाच्या मळ्यातून आला, वाघबिळाकडून आला असेल, कुणीतरी त्याला पाळले होते त्यांच्या तावडीतून तो सुटला असेल, अशा शक्यता या चर्चेतून व्यक्त केल्या जात होत्या. दरम्यान, वनविभागाने बिबट्याच्या आगमनाचा शोध घेण्यासाठी दोन ते तीनजणांचा समावेश असणारी दोन पथके तयार केली. त्याद्वारे शोधमोहीम सुरू केली. त्यांनी रुईकर कॉलनी परिसरातील बिबट्याने केलेला वावर, तेथील ठशांची पाहणी केली. एका पथकाने वाघबिळाच्या परिसरात पाहणी केल्याचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, परिसरातील उसाचे मळे, शेती, आदी ठिकाणी पाहणी केली जात आहे. बिबट्या पाहिलेल्या काही नागरिकांचे जबाब घेतले आहेत. यातील काहींच्या सांगण्यानुसार तो पाळीव होता की, काय? या दृष्टीनेदेखील तपासणी केली जाणार आहे. लोकप्रबोधनाचा उपक्रम राबविणार आहोत. बिबट्याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी आम्हाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षण, साधने १५ दिवसांत मिळविणार...बिबट्या तसेच अन्य स्वरूपातील वन्यप्राणी पकडण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना १५ दिवसांत देणार आहे. शिवाय आवश्यक त्या साधनांनी विभाग सज्ज करणार आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ कार्यालयाला कळविले असून, त्याला वरिष्ठांनी मान्यता दिली असल्याचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ट्रॅँक्युलायझर गन आणि औषधेदेखील आमच्याकडे होती. मात्र, गन चालविण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नव्हते. आता अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच अद्ययावत साधनांसह कोल्हापूर विभाग सज्ज केला जाणार आहे. असे प्रशिक्षण देण्याबाबत नाशिक आणि पुण्यातील उपवनसंरक्षकांशी बोलणे झाले असून, त्यांनी तयारी दाखविली आहे. १५ दिवसांत प्रशिक्षण पूर्ण केले जाईल. (प्रतिनिधी)जखमींची प्रकृती स्थिरकाल बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात चौघे जखमी झाले होते. यातील प्रमोद देसाई (रा. विद्या कॉलनी), संजय दुंडाप्पा कांबळे (रा. चांदणेनगर, रुईकर कॉलनी), शाहूपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल संताजी शीलवंत चव्हाण यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची आज उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे आणि वनविभागातील अधिकाऱ्यांनी भेट घेतली. या जखमींची प्रकृती स्थिर आहे.शिराळा : कोल्हापूर येथे जेरबंद केलेल्या बिबट्याचा चांदोली अभयारण्यात नेताना गुरुवारी (दि. १) मृत्यू झाला होता. तीन-चार दिवसांपासून उपाशी असल्याने आणि नागरिकांनी केलेल्या गोंधळाचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालात व्यक्त करण्यात आली. गुरुवारी रुईकर कॉलनी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करून चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी नेत असताना, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. वनक्षेत्रपाल भरत माने यांनी त्याला तपासले असता, तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. डॉ. सुहास देशपांडे यांनी चांदोली अभयारण्यातील झोळंबीजवळील जनीचा आंबा येथे त्याचे विच्छेदन केले. बिबट्या दोन-चार दिवस उपाशी होता. शिवाय त्याला पकडताना नागरिकांनी मोठा गोंधळ केला. उपासमार आणि गोंधळामुळे बिबट्याचे हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याचे डॉ. देशपांडे यांनी शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. शवविच्छेदनाचे चित्रीकरण केले आहे. त्यानंतर जनीचा आंबा येथे चांदोली राष्ट्रीय उद्यानातच बिबट्याचे दहन करण्यात आले. यापूर्वी १४ सप्टेंबर २०१४ रोजी खेड तालुक्यातील आपनीमेटा येथून चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी आणलेल्या नर जातीच्या बिबट्याचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. (वार्ताहर)