शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार कोटी शिवस्मारकास कुठून आणणार ?- राज ठाकरे

By admin | Updated: December 26, 2016 16:38 IST

सत्ताधारी भाजपा सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना साडेतीन हजार कोटी शिवस्मारकसाठी कुठून आणणार ?

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 26 - सत्ताधारी भाजपा सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना साडेतीन हजार कोटी शिवस्मारकसाठी कुठून आणणार ?, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी भाजपा सरकारवर शरसंधान साधलं आहे. सरकार शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये कुठून खर्च करणार आहे. सरकारकडून फक्त शोबाजी सुरू आहे. पुतळे बांधून शिवशाही येत नाही. स्मारकावर खर्च करण्यापेक्षा गड-किल्ले दुरुस्त करा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरून राज्य सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. ते नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.ते म्हणाले, निवडणुकांच्या तोंडावर काही तरी विकासकामांच्या योजनांची घोषणा करण्याचा काँग्रेसवाल्यांचा कित्ता आता भाजपाचे सरकार गिरवत आहे. शिवस्मारक भूमिपूजन सोहळा त्याचे उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी केली. भाजप सरकारकडून फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे. लोकांपुढे आकडे मांडून भूलथापा द्यायचा भाजपा सरकारचा डाव असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. नाशकात 112 कोटींच्या सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी ते येथे आले आहेत. विकासकामांची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे सध्या दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.