शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

महिला बालकल्याण समितीला सभापती मिळणार तरी केव्हा?

By admin | Updated: January 19, 2017 03:55 IST

महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन अर्धा महिना उलटला तरी अद्याप सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही.

कल्याण : महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन अर्धा महिना उलटला तरी अद्याप सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. कोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूकही झाली आहे. परंतु, जिल्ह्यातील अन्य महापालिका निवडणुकांच्या कामांमध्ये यंत्रणा व्यस्त असल्याने केडीएमसीतील महिला बालकल्याण सभापतीपदाच्या निवडणुकीला विलंब लागत असल्याचे बोलले जात आहे. महिला बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांत सेना गटाचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. समितीतील सदस्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपुष्टात आल्याने तत्पूर्वी समितीवर नव्या सदस्यांच्या प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार नियुक्तीच्या अनुषंगाने २६ डिसेंबरला विशेष महासभा बोलवली होती. यात नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, शीतल भंडारी, ऊर्मिला गोसावी, वैशाली भोईर (सर्व शिवसेना आघाडी गट), वैशाली पाटील, रेखा चौधरी, इंदिरा तरे, वृषाली पाटील-जोशी (सर्व भाजपा कल्याण-डोंबिवली विकास आघाडी), तर काँग्रेसच्या हर्षदा भोईर या नवनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर देवळेकरांच्या वतीने करण्यात आली. या समितीवर भाजपाच्या वतीने वैशाली पाटील आणि काँगे्रसच्या वतीने हर्षदा भोईर यांना पुन्हा संधी मिळाली आहे. पुढील सभापतीपद भाजपाकडे राहणार आहे. गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करत मनसेच्या वतीने सदस्याचे नाव देण्यात न आल्याने महापौरांकडून १० जणांचीच घोषणा करण्यात आली. एका सदस्याची नियुक्ती न झाल्याने बालकल्याण सभापतीपद निवडणुकीत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे महापौर देवळेकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>दोन ते तीन दिवसांत तारीख होणार जाहीरसचिव कार्यालयाकडून कोकण विभागीय आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार झाला आहे. परंतु, त्यांच्याकडून निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. अन्यत्र मनपा आणि जि.प.च्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यात ठाणे जिल्हा परिषदेसह काही महापालिकांचाही समावेश आहे. त्यामुळेच महिला बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत तारीख जाहीर होतील, असा केडीएमसीचा दावा आहे.