शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?

By दीपक भातुसे | Updated: April 22, 2025 07:38 IST

अपात्र महिलांना सुमारे ९०० कोटी  रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे. 

दीपक भातुसेमुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केली असून त्या या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. तसेच, ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरले त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत. मात्र, अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का, असा प्रश्न आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे.   

१३ लाखांवर महिला ठरल्या अपात्र २८ जून २०२४ रोजी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी १ जुलै ते १५ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची मुदत होती. या काळात सुमारे २.५ कोटी महिलांना अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळाली. विधानसभा निवडणुकीनंतर १३ लाखांवर महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. अपात्र महिलांना सुमारे ९०० कोटी  रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे. 

या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर सामूहिक उन्नतीसाठी करणाऱ्या महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येणार याबाबत अजून स्पष्टता नाही.   

अद्याप हालचाल नाहीराज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे महिला व बालकल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

यासंदर्भातील मूळ शासन निर्णयात जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केली. अर्ज पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल. - अदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजना