शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाला पाझर कधी फुटणार?

By admin | Updated: June 11, 2016 03:32 IST

मोरबे धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्तांकडे वेळोवेळी दाद मागितली होती

आविष्कार देसाई,

अलिबाग- मोरबे धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्तांकडे वेळोवेळी दाद मागितली होती. मात्र त्यांच्या मागण्यांना सातत्याने केराची टोपली दाखविल्याची धारणा धरणग्रस्तांची झाली आहे. आता त्यांनी कोकण आयुक्तांना पुन्हा पत्र लिहून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे करूनही प्रशासनाला पाझर फुटत नसल्याने धरणग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.खालापूर तालुक्यातील मोरबे धरणासाठी तेथील आदिवासी समाजाच्या जमिनी घेतल्या आहेत. बरीच वर्षे उलटूनही त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आलेले नाही. पिरकडवाडी, आरकसवाडी, उंबरणेवाडी, नम्राचीवाडी, वरोसे कातकरवाडी, नानीवली ठाकूरवाडी या आदिवासी वाड्यातील कुटुंब उध्वस्त झाले आहेत. त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे ज्या आदिवासी समाजाच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रश्नांची कोणीच दखल घेतलेली नाही. समाजातील लोकांचे होणारे हाल थांबविण्यासाठी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेने पुन्हा कोकण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी केली आहे.प्रश्न सोडविण्याची मागणीधरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी केली आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही सरकारला जाग येत नसल्याने आता करायचे तरी काय, असा प्रश्न वामन पिरकड, राजू उघडे, संदीप निरगुडा या धरणग्रस्तांनी उपस्थित केला आहे.