शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांच्या निवडणुका कधी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 04:17 IST

दुष्काळाचे कारण पुढे करून सरकार साखर कारखान्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलू शकत नाही,

मुंबई : दुष्काळाचे कारण पुढे करून सरकार साखर कारखान्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलू शकत नाही, अशा शब्दांत राज्य सरकारला फटकारत उच्च न्यायालयाने सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका कधी व किती दिवसांत घेणार? याचे उत्तर दहा दिवसांत देण्याचा आदेश सरकारला दिला.यंदा पाऊस वेळत आणि चांगल्या प्रमाणात पडला आहे. तरीही राज्य सरकार दुष्काळाचे कारण देऊन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. राज्य सरकार घटनेविरुद्ध भूमिका घेऊ शकत नाही, अशा शब्दांत सरकारची कानउघडणी करत मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला साखर कारखान्यांच्या किती दिवसांत निवडणुका घेणार, हे दहा दिवसांत स्पष्ट करायला सांगितले आहे. सोलापूरच्या मकाई सहकार साखर कारखान्याची निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्याने साखर कारखान्याच्या सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.याचिकेनुसार, मकाई साखर कारखान्याची कार्यकारिणीची मुदत ११ सप्टेंबर २०१६ रोजी संपुष्टात आली. त्यापूर्वी सरकारने एप्रिलमध्ये साखर कारखान्याला निवडणूक प्रक्रिया सुरू करून मतदार यादी तयार करण्याचे निर्देश दिले. मे २०१६ मध्ये साखर कारखान्याने मतदार यादी तयार करून सरकारकडे सादरही केली. मात्र याच दरम्यान सरकारने दुष्काळाचे कारण पुढे करत महाराष्ट्र सहकार अधिनियम, कलम ७३ (सी सी) च्या तरतुदीनुसार निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या. ‘राज्य घटनेच्या अनुच्छेद २४३ (झेड) (के) नुसार अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणीची मुदत संपण्यापूर्वी किमान दीडशे दिवस आधी निवडणूक कार्यक्रम सुरू करणे आवश्यक आहे. राज्य सरकाने निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात काढलेली अधिसूचना घटनेविरुद्ध आहे,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गिरीश गोडबोले व अ‍ॅड. सारंग आराध्ये यांनी केला. खंडपीठाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला. पश्चिम बंगाल सरकारनेही महाराष्ट्र सरकारप्रमाणे निर्णय घेतला होता.मात्र तो निर्णय घटनेविरुद्ध आहे म्हणून अयोग्य ठरवला होता. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रासाठी वेगळा निर्णय घेऊ शकत नाही, असे नमूद करत राज्यातील ‘अ’ वर्गातील साखर कारखान्यांच्या निवडणुका कधी व किती दिवसांत घेणार, हे दहा दिवसांत स्पष्ट करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. (प्रतिनिधी)