शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शीळफाटा दुर्घटनेतील मृतांना न्याय कधी मिळणार?

By admin | Updated: April 4, 2015 04:39 IST

मुंब्रा-शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेला आज दोन वर्षे होत आहेत. तरीसुद्धा, न्यायालयात या प्रकरणी खटला अजूनही उभा राहिलेला नाही.

पंकज रोडेकर, ठाणेमुंब्रा-शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेला आज दोन वर्षे होत आहेत. तरीसुद्धा, न्यायालयात या प्रकरणी खटला अजूनही उभा राहिलेला नाही. तर जामिनावर बाहेर असलेल्या त्या कथित आरोपींचे जामीन रद्द व्हावे म्हणून ठाणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दुर्घटनेचा निकाल तातडीने लागण्यासाठी विशेष न्यायालयाची निर्मिती करावी, अशी मागणी होऊनही त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने मयतांना न्याय कधी मिळणार? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. मयतांमध्ये ५ जणांची ओळख पटली नाही. तसेच ७ जण हे परदेशांतील असून, ६२पैकी दोघांच्या वारसांचा शोध सुरू असल्याने सरकारने जाहीर केलेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. अल्प कालावधीत मुंब्रा-शीळफाटा परिसरातील लकी कम्पाउंडमध्ये आदर्श ‘ए’ आणि ‘बी’ या दोन इमारती उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी ‘बी’ इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली. या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. ३६ जण जखमी झाले होते. त्या दुर्दैवी घटनेला शनिवारी दोन वर्षे होत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी तपासात सापडलेल्या एका नोंदवहीवरून २७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत २५ जणांना बेड्या घातल्या आहेत. त्यामध्ये इमारतीच्या मुख्य बिल्डरांसह त्यांचे भागीदार, महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोषारोपपत्रासह पुरवणी दोषारोपपत्रही दाखल केले आहे. याचदरम्यान, अटकेतील आरोपींनी जामिनावर बाहेर येण्यासाठी ठाणे व मुंबई न्यायालयांत धाव घेतली आहे. ६ जण न्यायालयीन कोठडीत आहेत; तर १९ जण जामिनावर आहेत. तत्कालीन महापालिका उपायुक्त दीपक चव्हाण यांच्यासह स्थानिक नगरसेवक हिरा पाटील आदींचा समावेश आहे. जामिनावर असलेल्या १५ जणांचे जामीन रद्द करण्यासाठी शहर पोलिसांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.