शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मिसाइल पडताना देश, झेंडा काही बघत नाही; तळा येथील यशचा युद्धाचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:53 IST

२४ फेब्रुवारीला सकाळी ४ वाजल्यापासून मिसाइल पडत असल्याचे आवाज येऊ लागले. माझ्या आईवडिलांनी विमानतळ पूर्णतः बंद झाले आहे, याची माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कतळा : सकाळी ४ वाजता पहिले मिसाइल पडले आणि त्या भयंकर आवाजाने आम्ही उठलो. सुखरूप पोहोचण्यासाठी तुम्ही भारताचा झेंडा लावा, असे सांगण्यात आले. परंतु, आधीच सोडलेले मिसाइल हे नाही ना बघणार की, तुम्ही कोणत्या देशाचा झेंडा लावला, हे पाहून पडणार नसल्याने काळजात धडकी भरली होती. वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या तळा शहरातील यश काळबेरे याने रशिया आणि युक्रेन युद्धातील भयानक अनुभवांचे कथन ‘लोकमत’शी केले आहे. 

२४ फेब्रुवारीला सकाळी ४ वाजल्यापासून मिसाइल पडत असल्याचे आवाज येऊ लागले. माझ्या आईवडिलांनी विमानतळ पूर्णतः बंद झाले आहे, याची माहिती दिली. त्यावेळेपासूनच मनात काहूर माजले होते. जवळपास १५ दिवस पुरेल एवढे खाद्यपदार्थ घेऊन मित्रांसोबतच बाहेर पडलो. केंद्र सरकार नागरिकांना घेण्यासाठी युक्रेनमध्ये नाही, तर  बाजूच्या देशांमध्ये पाठवणार आहे. रोमानिया व हंगेरीच्या बॉर्डर आमच्यापासून ९०० किमी लांब अंतरावर होत्या. त्यामुळे आमच्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मलडोवा बॉर्डरवर जायचा आम्ही निर्णय घेतला. मलडोवासाठी आमचा बसने प्रवास सुरू झाला. 

नशिबाने चालक चांगला असल्याने आजूबाजूला मिसाइल कोसळण्याचा आवाज येत असताना कसेबसे बॉर्डरवर पोहोचलो. महिला आणि लहान मुले यांनाच बॉर्डर पार करू देत होते. दोन वाजल्यापासून आम्ही बॉर्डरवर उभे होतो. साधारणत: ११ वाजता आम्हाला बॉर्डर पार करू दिली. कसेतरी रोमानिया एअरपोर्टवर पोहोचलो. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला समजले की, २६  फेब्रुवारीपासून या ठिकाणी बरीचशी मुले येऊन थांबलेली होती. आम्हाला अजित नावाचा दूतावासातील व्यक्ती भेटली. त्यांना खूप विनवणी केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारशी बोलून २६ फेब्रुवारीच्या विमानात आम्हाला समाविष्ट केल्यानंतर रोमानिया विमानतळावरून विमानाने दिल्लीकडे प्रस्थान केले.

दिल्लीला पोहोचल्यावर त्या ठिकाणी माझे बाबा माझी आतुरतेने वाट पाहत होते. मी माझ्या बाबांना बघताच त्यांना कडकडून मिठी मारली. दुसऱ्या दिवशी आम्ही  तळा येथे पोहोचलो. केंद्र सरकारने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, अजूनही काही भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांनादेखील आपल्या घरी सुखरूप परतण्यासाठी सरकारने मदत करावी.- यश काळबेरे, युक्रेनमधून परतलेला विद्यार्थी