मुंबई : अधिवेशन काळात अधिकाºयांनी मुख्यालय सोडू नये, ज्या विभागाची चर्चा सुरु आहे त्या विभागाच्या सचिवांनी व वरिष्ठांनी अधिकाºयांच्या गॅलरीत हजर रहावे अशा सूचना असतानाही अधिवेशनाच्या दुसºयाच दिवशी सत्ताधारी पक्षाचा कर्जमाफीच्या अनुषंगाने ठराव असतानाही अधिकाºयांची गॅलरी पूर्णपणे ओस पडली होती.अधिकारी सरकारला गांभीर्याने घेत नाहीत, त्यांच्यावर मंत्र्यांचा वचकच उरलेला नाही; त्यामुळे महत्वाच्या विषयावर चर्चा चालू असताना एकाही सचिवाला अधिवेशनात गॅलरीत येऊन कोण काय बोलत आहे, कोणते मुद्दे मांडत आहे, याचे टिपण घ्यावे वाटले नाही. यापेक्षा दुर्देव दुसरे असू शकत नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी देखील यावर तीव्र आक्षेप नोंदवला. जरी अधिकाºयांची गॅलरी अदृष्य असली तरी एकही सचिव येथे येत नाही, हे गंभीर आहे. अधिकाºयांनी सभागृहाचा योग्य तो मान ठेवायला पाहिजे अशा शब्दात त्यांनी आपले मत नोंदवले.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्य सचिवांसह अनेक सचिवांना फोन केले. तर कोणी बाहेर गेले आहे, कोणी मंत्रालयात नाही अशी उत्तरे त्यांना ऐकावी लागली. अनेक विभागांचा कर्जमाफीशी संबंध असताना एकजणही हजर नव्हता.
अधिवेशनाकडे अधिका-यांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:47 IST