शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

१० वर्षे जुने रेकॉर्ड शोधताना

By admin | Updated: November 19, 2014 00:57 IST

आदिवासी खात्यातील योजनांच्या अंमलबजावणीची न्यायालयीन चौकशी केली जात आहे. त्यासाठी १० वर्ष जुने रेकॉर्ड शोधताना आणि नियमित काम सांभाळताना या खात्याच्या राज्यभरातील

आदिवासी खात्याची दमछाक - न्यायालयीन चौकशी : आदिवासींपर्यंत पोहोचलेल्या योजनांचा शोध यवतमाळ : आदिवासी खात्यातील योजनांच्या अंमलबजावणीची न्यायालयीन चौकशी केली जात आहे. त्यासाठी १० वर्ष जुने रेकॉर्ड शोधताना आणि नियमित काम सांभाळताना या खात्याच्या राज्यभरातील यंत्रणेची प्रचंड दमछाक होताना दिसत आहे. २००३-०४ ते २००९-१० या काळात राज्याच्या आदिवासी विकास मंत्रालयाची धुरा विजयकुमार गावित यांच्याकडे होती. या काळात आदिवासींसाठी राबविलेल्या योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. याच अनुषंगाने बजरंग पोपट यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांच्या नेतृत्वात लवाद स्थापन करून चौकशी केली जात आहे. या चौकशी आयोगाचे मुख्यालय नाशिक आहे. या चौकशीच्या अनुषंगाने राज्यातील आदिवासी आयुक्तालय, अमरावती, नागपूर, ठाणे व नाशिक येथील आदिवासी अपर आयुक्तालय तसेच राज्यभरातील २९ आदिवासी प्रकल्प कार्यालयातील यंत्रणा कामी लागली आहे. परंतु दहा वर्ष जुने आणि २००३-०४ ते २००९-१० या तब्बल पाच वर्षांचे रेकॉर्ड शोधताना यंत्रणेच्या नाकी नऊ आले आहेत. कारण त्या काळातील संबंधित काही लिपिक सेवानिवृत्त झाले आहेत, कुणी बदलून गेले आहे. बदलून गेलेल्यांना कार्यालयात बोलविले असता आता त्यांनाही ते रेकॉर्ड सापडत नाही. नव्याने त्या जागांवर आलेल्या कर्मचाऱ्यांना तर जुने काहीच माहीत नाही. अशा स्थितीत दहा वर्ष जुन्या आदिवासी विकासाच्या योजनांची कागदपत्रे शोधणे या यंत्रणेसाठी जणू दिव्य ठरले ंआहे. अशाही परिस्थितीत आदिवासी विकास खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपलब्ध रेकॉर्ड आयोगाकडे सादर केले. आयोगातर्फे या खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती देण्याबाबत जाहीर आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या तारखांना समक्ष बोलावून रेकॉर्ड समजून घेण्यात आले. आता आयोगाची रेकॉर्डच्या अनुषंगाने प्रत्यक्ष चौकशी सुरू झाली आहे. गावित यांच्या आदिवासी विकास मंत्री पदाच्या कार्यकाळात विविध योजना राबविल्या गेल्या. त्यावर पैसाही खर्च झाला. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नसल्याचा आरोप आहे. न्या.गायकवाड आयोगाचा अहवाल केव्हा सादर होतो आणि त्यात काय वास्तव पुढे येते याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)