शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

मंत्रीमहोदय परीक्षार्थी बनतात तेव्हा..!

By admin | Updated: May 12, 2015 00:56 IST

राजकारणाच्या आखाड्यात सातत्याने परीक्षेला सामोरे जात असताना नेतेमंडळींना टोलवाटोलवीची उत्तरे दिली तरी चालून जात असते

नागपूर : राजकारणाच्या आखाड्यात सातत्याने परीक्षेला सामोरे जात असताना नेतेमंडळींना टोलवाटोलवीची उत्तरे दिली तरी चालून जात असते. परंतु प्रत्यक्षात सखोल अभ्यास करून उत्तरपत्रिका सोडविणे हे कठीणच. कामाच्या व्यापातून वेळ काढत सामाजिक व न्यायमंत्री राजकुमार बडोले हे काही काळासाठी चक्क परीक्षार्थी बनल्याचे दिसून आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा अभ्यासक्रमाच्या परीक्षेला सोमवारपासून सुरुवात झाली. ही परीक्षा देण्यासाठी ते परीक्षा केंद्रावर आले होते. चक्क मंत्री आपल्यासोबत परीक्षा देत असल्याचे पाहून इतर विद्यार्थी काही वेळासाठी भांबावले. बडोले यांची अनेक दिवसांपासून या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची इच्छा होती. व्यस्त दिनक्रमामुळे या अभ्यासक्रमाला नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेणे त्यांना शक्य नसल्याने बहि:शाल विद्यार्थी म्हणून परीक्षा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी सकाळी ९.३० वाजता ‘सोशल थॉट’ या विषयाचा पेपर असल्याने बडोले विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ येथील मराठी विभाग येथील परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच पोहोचले होते. आश्चर्याची बाब म्हणजे बडोले हे केवळ त्यांचे स्वीय सहायक, एक सुरक्षारक्षक व वाहनचालक यांना घेऊन साध्या गाडीनेच आले होते. बडोले पूर्ण तीन तास पेपर सोडवत होते व सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच पेपर सोडविल्यानंतर ते बाहेर पडले. शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत असताना नेहमी विद्यार्थी राहण्याचा प्रयत्न असतो. त्यातूनच ही परीक्षा देत आहे, असे बडोले म्हणाले. पहिला पेपर चांगला गेला तरी आता परवाच्या पेपरची तयारी करायची आहे, असे सांगून ते तातडीने परीक्षा केंद्राहून निघूनदेखील गेले. (प्रतिनिधी)