शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महादेव जानकरांना कुत्रा चावतो तेव्हा...

By admin | Updated: April 4, 2015 04:36 IST

गोरेगावच्या नागरी निवारा परिसरात गुरुवारी आमदार महादेव जानकर यांना कुत्रा चावला आणि त्यासाठीच्या इंजेक्शनसाठी त्यांना वणवण भटकावे लागले.

मुंबई : गोरेगावच्या नागरी निवारा परिसरात गुरुवारी आमदार महादेव जानकर यांना कुत्रा चावला आणि त्यासाठीच्या इंजेक्शनसाठी त्यांना वणवण भटकावे लागले. देशात अ‍ॅन्टी रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांना अमेरिकेशी संपर्क साधावा लागला. तीन दिवसांनंतर ते पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर चर्चाही झाली होती. आ. जानकर घरी परतत असताना एका व्यक्तीवर सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला केल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. तेव्हा एका कुत्र्याने त्यांच्या मांडीला जोरदार चावा घेतला. कुत्र्याचे चार दात त्यांच्या मांडीमध्ये रुतल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यांना गोरेगावच्या वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे एन्टी रेबीजच्या औषधांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी याच परिसरातील पठारे रुग्णालय गाठले. जिथे सुरक्षारक्षक आणि केमिस्ट दोघे दारू पिऊन तर्राट झालेले आढळले, असे जानकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कार्यकर्त्यांनी जसलोक, नानावटी, लीलावती, नॅशनल अशा बड्या रुग्णालयांमध्ये इंजेक्शनबाबत चौकशी केली. चेन्नईमध्ये अपोलो रुग्णालयात फोन केला. तेव्हा शेवटचे एक इंजेक्शन आत्ताच संपले, असे सांगण्यात आले. अख्ख्या देशभरात हे इंजेक्शन उपलब्ध नसून आम्ही अमेरिकेतून तुमच्यासाठी इंजेक्शनची सोय करतो, असे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर कांदिवलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)