शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

...जेव्हा दहशतवादी म्हणून होमगार्ड पकडला जातो

By admin | Updated: July 27, 2015 20:21 IST

पंजाबमधील गुरदासपूर येथे दहशतवाद्यांच्या चकमकीदरम्यान झाडात लपून बसलेला होमगार्ड सुरक्षा यंत्रणांच्या तावडीत सापडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

ऑनलाइन लोकमत

गुरदासपूर, दि. २७ -  पंजाबमधील गुरदासपूर येथे दहशतवाद्यांच्या चकमकीदरम्यान झाडात लपून बसलेला होमगार्ड सुरक्षा यंत्रणांच्या तावडीत सापडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत घाबरलेल्या स्थितीत असलेला हा होमर्गाड सुरुवातीला काही बोलत नसल्याने संभ्रम कायम होता. अखेर काही वेळाने त्याची ओळख पटली व सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याची रवानगी रुग्णालयात केली. 

गुरदासपूर येथील दिनानगर पोलिस ठाण्यावर सोमवारी सकाळी सैन्याच्या वेशात आलेल्या तिघा दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच पोलिस व तीन नागरीक मृत्यूमुखी पडले. तब्बल १० तास दहशतवादी व सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीदरम्यान दिनानगर पोलिस ठाण्यात ड्रायव्हर म्हणून काम करणारे होमगार्ड जैसल सिंह हे झाडामागे लपून बसले होते. चकमकीदरम्यान शोधमोहीम सुरु असताना जैसल सिंह दिसले. सुरुवातीला जैसल सिंह हे दहशतवादीच आहेत की काय असा प्रश्न सुरक्षा दलाच्या जवानांना पडला होता. त्यांनी जैसल सिंह यांची चौकशी केली पण ते काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर काही वेळाने जैसल सिंह यांची ओळख पटली व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चकमक सुरु होताच जैसल सिंह हे झाडामागे जाऊन लपले असावे असा अंदाज आहे.