शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

‘ट्रामा’चा ड्रामा संपणार कधी ?

By admin | Updated: November 21, 2014 00:54 IST

अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना व हृदयरोगाच्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे आणि त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी मेडिकलमध्ये ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाला सुरुवात झाली.

मनुष्यबळाची प्रतीक्षा : मेडिकलच्या ३०१ नव्या पदांना मंजुरीच नाही सुमेध वाघमारे - नागपूरअपघातांमध्ये जखमी झालेल्यांना व हृदयरोगाच्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे आणि त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी मेडिकलमध्ये ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाला सुरुवात झाली. दिलेल्या मुदतीत बांधकामही पूर्ण झाले. परंतु ट्रामासाठी लागणाऱ्या ३०१ पदांच्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नाही. यामुळे ११.६० कोटी रुपये खर्चून तयार झालेले ‘अ’ दर्जाचे ट्राम केअर सेंटर शोभेची वास्तू ठरत आहे. उपराजधानीत अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत रस्ता अपघातात १ हजार ५१३ जण जखमी झाले असून यातील ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्ता अपघातातील जखमींसोबतच, हृदयरोग आजाराच्या गंभीर रुग्णांना ‘गोल्डन अवर’ मध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचा जीव वाचू शकतो. या आधारे मेडिकलने ६ हजार ८८० चौ.मी. जागेवर ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाची योजना तयार केली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या १५० कोटी रुपयांमधून या सेंटरसाठी ११.६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु प्रस्तावित जागेवर बाबुंवनातील तब्बल १८५ झाडे अडसर ठरली. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यात लक्ष घातल्याने १६ आॅगस्ट २०१२ रोजी बांधकाम सुरू झाले. १८ महिन्यांच्या मुदतीत म्हणजे येत्या मार्च महिन्यात बांधकाम पूर्ण झाले. नुकतेच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी काही महत्त्वाचे बदल सांगितले. मात्र, हे कामही आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या सेंटरमध्ये तळमजल्यावर स्वागतकक्ष, चिकित्सा विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, सिटी स्कॅन, एमआरआय, डिजिटल एक्स-रे मशीन व पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड असणार आहे. पहिल्या मजल्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग व बाह्यरुग्ण विभाग असेल. दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभागासह पुरुष आणि महिलांचा वॉर्ड असणार आहे. ..तरीही प्रस्तावाला मंजुरी नाही!नागपूर : स्वागतकक्ष, प्रतीक्षालय, उपचार क्षेत्रात गंभीर आजाराच्या रुग्णांना त्वरित सेवा मिळण्यासाठी लाल, तांबडा आणि हिरव्या रंगाचे कक्ष, ब्लड बँक आदींची सोय असणार आहे. या अवाढव्य प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी २०१२ मध्ये ६०० नवीन पदांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) पाठविण्यात आला. परंतु संचालनालयाने यावर आक्षेप घेतला. कमीतकमी मनुष्यबळाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पाठविण्यात आलेल्या ४०० नव्या पदालाही नकार मिळाला. दरम्यानच्या काळात डीएमईआरकडून ट्रामा केअर सेंटरची पाहणी झाली. त्यांनी ३०१ पदांचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. त्यानुसार हा नवा प्रस्ताव ७ फेब्रुवारी २०१४ रोजी डीएमईआरकडे पाठविण्यात आला. तेथून हा प्रस्ताव १८ फेब्रुवारी २०१४ रोजी मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र,नऊ महिन्यांच्या कालावधीनंतरही मंजुरी मिळाली नाही. (प्रतिनिधी)