शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 02:43 IST

महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, वह्या, रेनकोट व इतर साहित्य मिळालेले नाही.

नवी मुंबई : महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, वह्या, रेनकोट व इतर साहित्य मिळालेले नाही. निविदा प्रक्रिया रखडल्याने ही दिरंगाई झाली आहे. वह्या व गणवेशासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना किमान दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका सर्व विद्यार्थ्यांना वह्या, रेनकोट, बूट, गणवेश व इतर साहित्य मोफत देत असते. प्रत्येक वर्षी पावसाळा संपत आल्यानंतर रेनकोट व दिवाळीच्या दरम्यान गणवेश दिला जायचा. याविषयी पालकांसह लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर तीन वर्षांपासून मे महिन्यामध्येच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात होती. परंतु यावेळी शैक्षणिक साहित्याच्या टेंडरवरून आरोप - प्रत्यारोप झाल्याने ते रद्द करून पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. निविदेची प्रक्रिया करण्यासाठी विलंब झाल्याने शाळा सुरू होवून दीड महिना झाल्यानंतरही शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालेले नाही. विद्यार्थ्यांना वह्याही मिळाल्या नसल्याने दुकानांमधून खरेदी कराव्या लागल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरू असून रेनकोट न दिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळा सुटल्यावर पुन्हा घरी जाताना भिजावे लागत आहे. शैक्षणिक साहित्य कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. जुने गणवेश घालून विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे. पुस्तके ठेवण्यासाठी बॅगही नाही. स्वातंत्र्य दिन जवळ आला असून तोपर्यंततरी नवीन गणवेश मिळणार का, असा प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वह्या व गणवेश पुरविण्यासाठी फेरनिविदा मागविण्यात आली आहे. यामुळे किमान दोन महिने ते मिळणार नाही. रेनकोट व इतर साहित्य खरेदीसाठी कार्यादेश दिला असून एक महिन्यात साहित्य विद्यार्थ्यांना मिळू शकेल, असे सांगितले. विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना पत्र देवून लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. >आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. रेनकोट न दिल्याने विद्यार्थ्यांना भिजावे लागत आहे. वह्या, गणवेश, बॅग काहीच मिळालेले नाही. विद्यार्थ्यांना तत्काळ साहित्य मिळावे यासाठी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य मिळावे, अशी मागणी केली आहे. - महेश कोठीवाले, शाखा प्रमुख शिवसेना