शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी वाहनचालक बनतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 18:36 IST

संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना वाहनचालक बनलेले तुम्ही कधी पाहिले आहे का. पण अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वाहचालकाचा गाडीचे सारथ्य करत वेगळा आदर्श घालून दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 4  - संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना वाहनचालक बनलेले तुम्ही कधी पाहिले आहे का. पण अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वाहचालकाचा गाडीचे सारथ्य करत वेगळा आदर्श घालून दिला आहे. 31 वर्षे जिल्हाधिकाऱ्यांचे वाहनचालक म्हणून सेवा बजावून निवृत्त होत असलेल्या अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहनचालक दिगंबर ठक (मामा) यांच्या गाडीचे सारथ्य करत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वेगळा आदर्श घालून दिला.   
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहन चालक दिगंबर ठक महसूल विभागात 31 वर्ष सेवा बजावून 31 ऑक्टोबरला सेवा निवृत्त झाले. त्यांना काल अकोल्याचे जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यानी अभूतपूर्व असा निरोप दिला , ज्या ड्रायव्हरच्या सीटवर बसून दिगंबर मामा गेली 31 वर्ष आपली सेवा बजावत होते आणि त्यांच्या मागच्या सीटवर जिल्हाधिकारी बसत होते. आज चक्क जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यानी ड्रायव्हरची सीट घेतली आणि दिगंबर मामा जिल्हाधिकारी बसतात त्या सीटवर  बसले. त्यापूर्वी जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानी सोनम श्रीकांत यानी त्यांचा उचित गौरव केलेला होताच. जिल्हाधिकाऱ्यांनी  त्यांच्या निवास्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालय हा साधारण एक ते दीड किलोमीटरचा रस्ता ड्रायव्हिंग करत दिगांबर मामांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. 
दिगंबर मामा भावविभोर झाले होते ...डोळे आनंदाने डबडबलेले होते. 31 वर्षाच्या सेवेचे सार्थक झाल्याचा भाव मनात तरंगत असल्याचे भाव चेहऱ्यावर जाणवत होते. एवढे होवूनही हा सोहळा संपला नव्हता. जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क आपल्या शेजारच्या व्हीआयपी चेअरवर बसवून दिगंबर मामांचा अख्ख्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साक्षीने सपत्निक  सत्कार केला.   लाल दिव्याची चांदीची कार भेट दिली.  ब्रिटीश काळापासूनच्या या कचेरीने अनेकानेक जिल्हाधिकारी पाहिले. अनेक सेवानिवृत्तीचे गौरव पाहिले पण सोहळा या सम हाच....!!