शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

ब्रिटीशकालीन भाटघर धरणाचे ४५ स्वयंचलित दरवाजे उघडतात तेव्हा...

By admin | Updated: August 9, 2016 20:47 IST

तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणाचे पाणी खाली सोडण्यासाठी बसविलेल्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी (ट्रायल) घेण्यासाठी ४५ दरवाजांमधून मंगळवारी २० हजार ४३० क्युसेक्सने

ऑनलाइन लोकमत
 
भोर, दि. 09 -  तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणाचे पाणी खाली सोडण्यासाठी बसविलेल्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी (ट्रायल) घेण्यासाठी ४५ दरवाजांमधून मंगळवारी २० हजार ४३० क्युसेक्सने १० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. चाचणी यशस्वी झाल्यावर अर्ध्या तासात पाणी पुन्हा बंद करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव व उपअभियंता विजय नलावडे यांनी सांगितले.  
भाटघर धरण भागात आज १६ मिमी, तर एकूण ७५७ मिमी पाऊस होऊन धरण ९७ टक्के भरले आहे. २३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणावरील ४५ स्वयंचलित दरवाजांची चाचणी घेण्यासाठी धरणावर कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून पाणीपूजन करून सायंकाळी ४.१५ वाजता भोंगा वाजवून सर्वांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर ४ वाजून १७ मिनिटांनी धरणाचा पहिला गेट सुरू करण्यात आला. ४.३० वाजता शेवटचा ४५ वा गेट सुरू होऊन धरणातील प्रत्येक दरवाजातून ४५४ क्युसेक्सने पाणी बाहेर पडत होते. अशा एकूण ४५ दरवाजांतून २०४३० क्युसेक्सने १० दशलक्ष घनफूट पाणी बाहेर पडले. 
हे स्वयंचलित दरवाजे ४५ नंबरच्या दरवाजाकडून सुरू झाले आणि १२ मिनिटांत एक नंबरच्या दरवाजापर्यंत गेले. गेटवॉल बंद केल्यावर एक नंबरच्या दरवाजाकडून १२ मिनिटांत ४५ नंबरच्या दरवाजापर्यंत येऊन बंद झाले. ३० मिनिटांत आॅटोमॅटिक (स्वयंचलित) दरवाजे सुरू झाले आणी बंदही झाले.
भाटघर धरणाला ४५ स्वयंचलित आणि ३६ रोलिंगचे असे एकूण ८१ दरवाजे असून यातून प्रतिसेकंदाला ५६ हजार ७०० वेगाने एकावेळी पाणी बाहेर पडते. भाटघर धरण गतवेळी ७० टक्केच भरले होते. मात्र या वेळी एक महिना अगोदरच ९७ टक्के भरले असून दोन-तीन दिवसांत १०० टक्के भरेल, असे शाखा अभियंता सदाशिव देवडे यांनी सांगितले.