शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्सअ‍ॅप’ प्रचारावर ‘कंट्रोल’ कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 06:23 IST

- योगेश पांडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते ‘सोशल मीडिया’ला उमेदवारांकडून जास्त महत्त्व ...

- योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते ‘सोशल मीडिया’ला उमेदवारांकडून जास्त महत्त्व देण्यात येत आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबुक’सह विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे. उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक लक्ष ठेवणार असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. मात्र प्रत्यक्षात ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारख्या ‘अ‍ॅप’वरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी ‘सायबर सेल’ तसेच आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नाही. अशा स्थितीत पहिल्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर मतदानापर्यंत नियमांना धाब्यावर बसवून ‘सोशल मीडिया’वर प्रचाराचा धुरळा उडतच राहण्याची चिन्हे आहेत. या प्रचारावर आयोग लक्ष ठेवणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निवडणुकांत उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक नजर राहणार असल्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला होता. यासंदर्भात लक्षदेखील ठेवण्यात येत असून त्याच्या खर्चाची आकडेवारीदेखील उमेदवार आयोगाकडे सादर करत आहेत. विविध संकेतस्थळांसोबतच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर सर्वात जास्त प्रचार होताना दिसून येत आहे. या माध्यमातून एकाच वेळी कमी खर्चात जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचणे शक्य असल्याने अनेक उमेदवारांची प्रचार यंत्रणा यावर भर देत आहे. उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया हॅडलर्स’ तसेच कार्यकर्त्यांकडून विविध ‘ग्रुप’ तयार करण्यात आले आहे व दररोज शहरातील लाखो लोकांपर्यंत विविध ‘ग्रुप्स’च्या माध्यमातून संदेश पोहोचत आहेत.

मुदत संपल्यानंतर सभा, रॅली, पत्रकांचे वाटप इत्यादी प्रकारचा प्रचार बंद होणार आहे. उमेदवारांच्या क्रमांकावरूनदेखील प्रचाराचा एकही संदेश जाणार नाही. मात्र त्यांच्या प्रचार यंत्रणेतून, कार्यकर्ते, नातेवाईक यांच्या माध्यमातून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर मात्र प्रचाराची रणधुमाळी सुरूच राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर पोलिसांच्या ‘सायबर सेल’कडे यासंदर्भात यंत्रणा आहे का याची विचारणा करण्यासाठी उपायुक्त श्वेता खेडकर यांना संपर्क केला असता त्या बैठकीत असल्याने त्यांनी बोलण्यास नकार दिला.निवडणूक आयोगाने ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. मात्र ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील संदेशांची चाचपणी करणे ही कठीण बाब आहे. शिवाय उमेदवारांचे कार्यकर्ते, प्रचार यंत्रणा लक्षात घेता प्रत्येकाच्या फोनमधील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची तपासणी करणे शक्यच नाही. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर नेमक्या कुठल्या संदेशांची देवाणघेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही.