शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

जे काही केलं ते मुख्यमत्र्यांच्या सहीनं - छगन भुजबळ

By admin | Updated: February 10, 2016 12:05 IST

महाराष्ट्र सदनसह सर्व संबंधित निर्णय सगळ्या खात्यांच्या संमतीनं वमुख्यमंत्र्यांच्या सहीनं झाल्याची बाजू छगन भुजबळ यांनी मांडली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - आमच्यावरील सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत, महाराष्ट्र सदन बांधकामात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही असं सांगताना महाराष्ट्र सदनसह सर्व संबंधित निर्णय सगळ्या खात्यांच्या संमतीनं व मुख्यमंत्र्यांच्या सहीनं झाल्याची बाजू छगन भुजबळ यांनी मांडली आहे. तसेच, आतापर्यंतच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य केलं आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषेद घेउन त्यांच्यावरील आरोपाचं खंडन केले. समीरची चौकशी करायला काही हरकत नाही, पण अटक करायची काय गरज होती असं विचारत ही कारवाई सुडबुद्धीनं होत असल्याचं भुजबळ म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आणि आनंद परांजपे उपस्थित होते. 
 
 
 
पत्रकार परिषदेत भुजबळांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे -
 
- १ तारखेपासून बऱ्याच घडामोडी सुरु आहेत, मी वॉशिंग्टनला गेल्यानंतर भुजबळ पळून गेल्याची चर्चा सुरु झाली
कामाच्या फाईल अनेक विभागांनी तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली, एक नव्या पैशाचाही घोटाळा झाला नाही 
मी आतापर्यंतच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य केलंय, मी पळून जाण्याचा प्रश्नच नव्हता, मी अमेरिकेत होतो, इथं माझ्याबाबत अफवा पसरवल्या गेल्या. अमेरिका दौरा पुर्वनियोजित होता, शरद पवारांना माझ्या दौऱ्याची कल्पना होती.
 
- अनियमितता कुठेही झाली नाही असा अधिकाऱ्यांनी अहवाल दिला असताना परत चौकशी का?  स्वत:हून कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत, सर्व निर्णय सामुहिक असून कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही.
 
- आपण कोणतीही चूक केलेली नसून कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत शरद पवारांचा आशिर्वाद आपल्या पाठिशी आहोत.
 
- कालिना असो व खारघर येथील मालमत्ता असो, या काही आमच्या मालमत्ता नाहीत, त्यात अनेक भागीदार आहेत. या सगळ्या आमच्या मालमत्ता आहेत हे म्हणणं चुकीचं.
 
- सगळ्या महत्त्वाच्या खात्यांच्या सचिवांनी व्यवहार बघितले, सह्या केल्या, निविदा काढल्या, मुख्यमंत्र्यांच्या सहीनं मंजुरी देण्यात आली. असं असताना माझ्यावर ठपका का?
 
- जर का घोटाळा वाटत असेल तर त्यासाठी संपूर्ण निर्णयप्रक्रिया बघायला हवी आणि त्यानुसार विचार व्हायला हवा.
 
- इतर भूखंडांबाबत जे काही बोललं जातं, ते व्यावसायिक निर्णय आहेत. त्यात अनेक भागीदार आहेत. झोपडपट्टी पुनवर्सन सारख्या योजना आहेत. जे काही आहे ते पारदर्शी आहे आणि सगळे व्यावसायिक करतात त्याप्रमाणेच योग्य आहे.
 
- समीरनं जे काही केलं ते नियमांना धरून केलं आणि सगळ्या प्रकारच्या चौकशीला आम्ही सामोरे जात आहोत.
 
- भ्रष्टाचारविरोधी पथकानं हिच चौकशी केली, त्यांना अटक करावीशी वाटली नाही, मग ईडीनंच का अटक केली.
 
- १५ वर्षांचे व्यवहार व हिशोब मागितल्यावर ते द्यायला वेळ लागणारच, त्याला असहकार्य म्हणत नाहीत. समीरनं स्वत: फोन करून चौकशीला गेला.
 
 
दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे अखेर आज दुपारी अमेरिकेतून मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी विमानतळावर मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले
 
गेल्या आठवड्यात भुजबळ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापे मारण्यात आले होते. एक डझनपेक्षा जास्त अधिका-यांनी छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारले
छगन भुजबळ लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसतील अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या छाप्यांवर दिली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती. 
तर याचप्रकरणी भुजबळ यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ यांना इडीने गेल्या आठवड्यात अटक करून त्यांचा पासपोर्टही जप्त केला.