मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर पहिल्यादाच पक्षाचे प्रमुख राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहेत, त्यामुळे ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीपुर्वीच पक्षाला लागलेली गळती, मुंबईत २८ नगरसेवकांवरुन थेट सातवर नगरसेवकांवर झालेली घसरगुंडी, नाशिनमध्ये विकास कामे केल्याचा दावा करूनही मतदारांनी मनसेला साफ नाकारले आहे. (प्रतिनिधी)
राज आज काय बोलणार ?
By admin | Updated: March 9, 2017 00:53 IST