शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीचे काय होणार?

By admin | Updated: June 12, 2014 01:25 IST

एलबीटी रद्द करून महापालिकांच्या पर्यायी उत्पन्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत व्यापारी प्रतिनिधी, महापौर व आयुक्तांसोबत बैठक घेतली.

सक्षम पर्यायासाठी चर्चा : अंतिम निर्णय शासनचाचनागपूर : एलबीटी रद्द करून महापालिकांच्या पर्यायी उत्पन्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत व्यापारी प्रतिनिधी, महापौर व आयुक्तांसोबत बैठक घेतली. परंतु राज्यातील काही महापालिकांचा एलबीटीला पाठिंबा आहे तर काहींचा विरोध असल्याचे पुढे आल्याने यावर निर्णय होऊ शकला नाही. एलबीटीवरील सरचार्जचा पर्याय खारीज करण्यात आल्याने एलबीटी की जकात असे दोनच पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. एलबीटीमुळे नागपूर महापालिकेला १५० कोटींचा फटका बसला आहे. याचा परिणाम विकास कामावर झाला. प्रभागातील लहानसहान कामासाठी मनपाकडे निधी नसल्याने एलबीटी रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे. मोठ्या व्यापाऱ्यांसोबतच मनपातील पदाधिकारी व विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची एलबीटी रद्द करण्याची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, गटनेते व ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही अपवाद वगळता सर्वांनीच एलबीटीला नकोे अशी भूमिका घेतली आहे. बुधवारी व्यापारी संघटनांशी झालेल्या चर्चेचा अहवाल मनपाकडून प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार यावर लवकरच अंतिम निर्णय घेणार आहे.