शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Election 2019 :कडुलिंबाच्या झाडाला साखर टाकून फायदा काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 06:34 IST

काँग्रेस आघाडीच्या आव्हानाबाबत सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कडूलिंबाच्या झाडाला साखरेचं कितीही पाणी टाकलं तरी ते गोड होऊ शकत नाही. तद्ववतच सत्तेसाठीची पात्रता आणि विश्वास गमावून बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मतदान करण्यात अर्थ नाही आणि सत्तेबाबत युतीशिवाय पर्याय नाही याची मतदारांना जाणीव असल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

सगळे भाजपवाले सध्या शरदपवार यांच्यावरच का तुटूनपडले आहेत?तुटून पडण्याचा प्रश्नच नाही. आमचा अजेंडा शरद पवारांवर टीका करण्याचा नाही. महाराष्ट्राच्या विकासाचा आहे पण, पवार हे रोजच्या रोज भ्रम निर्माण करणारे राजकारण करीत आहेत. तसे ते वषार्नुवर्षे करत आलेच. कधी जातीच्या नावाखाली तर कधी धर्माच्या नावाखाली संघ, भाजपला ठोकायचे आणि सत्ता मिळवायची हेच त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या भ्रामक प्रचाराला प्रत्युत्तर द्यावेच लागेल. पवारांच्या राजकारणाला उतरती कळा केव्हाच लागली आहे. विधानसभा निवडणूक निकालात त्यांचं भ्रमाचं राजकारण संपल्याशिवाय राहणार नाही.अनेक ठिकाणी भाजपचेबंडखोर उमेदवार उभे आहेत.या बंडखोरीचा फटकाभाजपला बसेल?भाजपमध्ये बंडखोरांना कधीही यश आले नाही हा आजवरचा अनुभव आहे. बलराज मधोक, येडियुरप्पा, उमा भारती, कल्याणसिंह अशा अनेकांनी बंड करून बघितले, पण त्यांच्या पाठीशी भाजपमधील कोणीही उभे राहिले नाही; ते एकटे पडले. एक तर ते संपले किंवात्यांना पुन्हा भाजपमध्ये परत यावे लागले. आज विधानसभेला उभे असलेल्या भाजपच्या बंडखोरांना पक्ष संघटना त्यांच्या दावणीला बांधली आहे असे वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे आणि निकालामध्ये तो तुटेलच.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीमतदारांना विरोधी पक्षाचीभूमिका मागितली आहे.आपल्याला काय वाटतं?नेमकी कोणती भूमिका वठवायची हे याबाबत राज नेहमीच गोंधळात राहिले आहेत. नेता कामाने मोठा होत असतो; भाषणाने नाही हेदेखील त्यांना इतक्या वर्षात समजले नाही. स्वत:च्या पक्षाचे आमदार, नेते,नगरसेवक त्यांना टिकवता आले नाहीत. एका गोष्टीसाठी मी त्यांचं कौतुक करतो. मनसेसह कोणत्याही विरोधी पक्षाची सत्ता महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे त्यांना वेळीच कळून चुकले आहे. त्यामुळेच ते दुधाची तहान ताकावर भागवत विरोधी पक्षाचा रोल मागत आहेत. त्यांना तो रोलदेखील मिळणार नाही.सुशीलकुमार शिंदे म्हणतातत्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीयांचे भविष्यात विलीनीकरणहोईल असं वाटतं का?विलीनीकरण झाले काय अन् नाही झाले काय त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. एक अधिक एक बरोबर दोन होतात पण आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था शून्यासारखी झाली आहे. त्यामुळे शून्य अधिक शून्य बरोबर शून्यच होणार. लोकांचा विश्वास संपादन करून सत्तेपर्यंत पोहोचण्याची क्षमता या दोन्ही पक्षांनी गमावली आहे. दोन्ही पक्ष आता थकले असल्याचे वास्तव स्वत: शिंदे यांनीच स्वीकारले आहे.वित्त मंत्री म्हणून आपण केलेलीठोस कामगिरी कोणती?राज्य महसूल तुटीतून महसुली अधिक्यापर्यंत नेण्यात यश आलं. गेल्या वर्षी २०८२ कोटींचे आधिक्य होते. यंदा ते अंदाजे १५ हजार कोटी रुपये असेल. अर्थसंकल्प हा केवळ सरकार आणि मंत्र्यांचा न राहता मी जनतेच्या सूचना मागवल्या आणि त्या अर्थसंकल्पात अंतर्भूत केल्या. त्यामुळे जनकल्याणाचा अर्थसंकल्प देऊ शकलो. आघाडी सरकारमधील २८.२ टक्क्यांचा ऋणभार १५ टक्क्यांपर्यंत खाली आणला.काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचंआव्हान भाजपला मोठं वाटतं का?काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वासाठी संघर्ष सुरू आहे. काका-पुतण्याची ही लिमिटेड पार्टी सध्या हा संघर्ष अनुभवत आहे. एकमेकांना शह-काटशह देणा?्या नेत्यांची राष्ट्रवादीत गर्दी आहे.अशावेळी या पक्षाचे नाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीऐवजी वादावादी पार्टी ठेवण्याची वेळ आली आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दोन नातू यांच्याशिवाय त्या पक्षात कोणीही महत्त्वाचे नाही.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019