शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
3
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
4
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
5
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
6
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
7
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
8
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
9
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
10
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
11
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
12
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
15
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
16
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब
18
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
19
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
20
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी

मलालाला दिलेल्या ‘नोबेल’ची किंमत ती काय?

By admin | Updated: May 1, 2016 01:13 IST

अवघ्या १६ वर्षांच्या मलाला या मुलीला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. त्याची किंमत काय आहे ? असा कुणालाही दिला गेलेला पुरस्कार जर मला दिला तर मी घेणार नाही, अशी टीका

लातूर : अवघ्या १६ वर्षांच्या मलाला या मुलीला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. त्याची किंमत काय आहे ? असा कुणालाही दिला गेलेला पुरस्कार जर मला दिला तर मी घेणार नाही, अशी टीका ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी शनिवारी येथे केली. लातुरमधील विविध संस्थांच्या वतीने मांजरा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाला भेट देण्यासाठी ते आले होते. यावेळी ‘एमबीएफ’च्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मलाला या १६ वर्षाच्या मुलीचे कर्तृत्वच काय? अशा मुलीला नोबेल देऊन पुरस्काराची पत गेली. त्यामुळे आता हा पुरस्कार जरी मला मिळाला तरी मी तो घेणार नाही. मी कोणत्याही पुरस्कारासाठी काम करीत नाही. तो पुरस्कार राजकीय झाला आहे. काम करुनही पुरस्कार मिळेल याची खात्री नाही. माझ्याकडे काही लोक आले होते. परंतु मी या पुरस्काराच्या राजकारणात पडू इच्छित नाही. सिंचनासाठी खूप प्रकल्प झाले, त्या पाण्यावर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार. मात्र तसे होत नाही, असे सांगून रवीशंकर म्हणाले की, नद्याचे पुनरुज्जीवन आणि नद्याजोड हे दोन मुख्य कामे सरकारने हाती घ्यायला हवीत. नद्या या देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या नाड्या आहेत. त्या जोडल्या तर हरितक्रांती दूर नाही. हीच बाब ओळखून आम्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष काम करीत आहोत. महाराष्ट्रात यापूर्वी १६ नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी १७ वी आहे. यापूर्वी या जिल्ह्यात ‘आर्ट आॅफ लिव्हींग’ने घरणी आणि तावरजा नदीवर काम केले. शासनाने हे काम केले असते तर किमान दहा वर्षे लागले असते. परंतु लोकसहभागामुळे हे लवकर होत आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेची बाब असल्याचे सांगून ते म्हणाले, देवावरचा आणि समाजावरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे शेतकरी खचून आत्महत्या करीत आहे. यासाठी शेतकऱ्यांना बळ देणे आवश्यक आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे समाजाने त्यांना सांगितले पाहीजे. आर्ट आॅफ लिव्हींगच्या वतीने आम्ही हे करीत असून तन, मन आणि धन यासाठी देत आहोत. (प्रतिनिधी)फक्त मने प्रदूषित झाली!आम्ही यमुनेच्या पात्रात कार्यक्रमात घेतला. अनेकांनी आरोप केले की नदीचे प्रदूषण झाले. आमचे आव्हान आहे की, शास्त्रीय पध्दतीनेकुणीही आम्हाला सिध्द करुन दाखवावे की हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण झाले? आम्ही कोणत्याही कारवाईला सामोरे जाऊ. पणआमच्या कार्यक्रमामुळे मात्र काहींची मने प्रदूषित झाल्याचेश्री श्री रविशंकर यांनी सांगितले.