शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे करायचे काय? बारदान्याअभावी ३० टक्केच खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, आज मुदत संपणार

By सुनील चरपे | Updated: January 12, 2025 10:03 IST

केंद्र सरकारने चालू हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली.

नागपूर : राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने राज्यात ५६२ साेयाबीन खरेदी केंद्र सुरू केले. या दाेन्ही संस्थांना १४ लाख १३ हजार मेट्रिक टन साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले. या संस्थांनी तीन महिन्यांत केवळ ३० टक्केच उद्दिष्ट पूर्ण केले. १२ जानेवारीला या खरेदीची मुदत संपणार असून, आठवडाभरापासून बारदान्याअभावी बहुतांश केंद्रांवरील साेयाबीन खरेदी बंद आहे. 

केंद्र सरकारने चालू हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली. खरेदी हंगाम सुरू हाेताच खुल्या बाजारात साेयाबीनचे दर प्रतिक्विंटल २,९०० रुपयांपर्यंत खाली आले हाेते. त्यानंतर हेच दर ३,७०० ते ४,००० रुपयांच्या आसपास स्थिरावले. विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने एमएसपी दरात १४ लाख १३ हजार मेट्रिक टन साेयाबीन खरेदीचा निर्णय घेतला.

बैठक व टेंडरचे वरातीमागून घाेडेहा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (दि. ८) मंत्रालयात विशेष बैठक बाेलावली. बैठकीत त्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना बारदान्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यावर चार दिवसांत बारदाना उपलब्ध करून देण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आणि गुरुवारी (दि. ९) नवीन बारदान्याचे टेंडर मागविले. रविवारी (दि. १२) साेयाबीन खरेदीची मुदत संपणार असल्याने बैठक व टेंडरला अर्थ काय? असा प्रश्न आहे. 

जुजबी उपाययाेजनासाेयाबीन भरण्यासाठी ५० किलाे क्षमतेच्या पाेत्यांचा वापर केला जाताे. या पाेत्यांवर नाफेडचा लाेगाे, स्टॅम्प व इतर माहिती प्रिंट केलेली असते. एकूण उद्दिष्टाच्या किमान ७० टक्के साेयाबीन नाफेडला खरेदी करावयाची हाेती. आता शेतकऱ्यांचा राेष कमी करण्यासाठी नाफेडने सुस्थितीत व प्रिंट असलेली जुनी पाेती वापरण्याचा फतवा नाफेडने काढला. 

टॅग्स :Soybeanसोयाबीन