शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नव्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत का ?

By admin | Updated: February 27, 2017 18:07 IST

महापौर बंगल्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आज मुंबई महापालिका सभागृहात एकमताने मंजुर करण्यात आला.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27 - दादर येथील महापौर बंगल्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे  स्मारक  उभारण्याचा प्रस्ताव आज मुंबई महापालिका सभागृहात एकमताने मंजुर करण्यात आला. महापौर बंगल्यामध्ये स्मारक उभे राहिल्यानंतर महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील राणीच्या बागेत हलवण्यात येण्याची शक्यता आहे. पालिका सभागृहात कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 'स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासामार्फत' स्मारकाची उभारणी केली जाईल.  
 
महापौर बंगल्याची जागा स्मारकाला दिल्यानंतर राणीच्या बागेमधील एका जुन्या बंगल्यात महापौरांचे निवासस्थान असेल अशी चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत या मुद्यावरुन जोरदार राजकारण तापले होते. महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वापरण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विरोध आहे. 
 
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या आडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महापौर बंगल्यावर डोळा आहे असा आरोप राज यांनी केला होता. उद्धव ठाकरेंची नजर समुद्रकिनारी वसलेल्या महापौर बंगल्यावर आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या नावाखाली उद्धव ठाकरेंना तो बंगला हडपायचा आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी केला होता. महापौर बंगल्याच्या जागी स्मारक आणि महापौरांचा बंगला राणीच्याबागेत. जिथे एकही प्राणी नाहीय. लोक तिथे महापौरांना बघायला येणार अशी टीका राज यांनी केली होती.