शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साहसी क्रीडा प्रकार म्हणजे नेमके काय? न्यायालयाने फटकारले

By admin | Updated: July 17, 2017 21:33 IST

आपली नेमकी भूमिका स्पष्ट करा असा आदेशच राज्य सरकारला देण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात करण्यात येईल असं आश्वासन राज्य सरकार वारंवार देत असतं. मात्र सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं. साहसी क्रीडा प्रकार म्हणजे नेमकं काय ? अशी विचारणाच न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. इतकंच नाही तर पाच वर्षांच्या मुलाला उंचीवर चढवण्यात कोणतं साहसं आहे? असा सवालही विचारला. आपली नेमकी भूमिका स्पष्ट करा असा आदेशच राज्य सरकारला देण्यात आला आहे. 
 
संबंधित बातम्या 
 
न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर काही निर्बंध लावले आहेत, ज्याचा गोविेदा पथकांकडून विरोध होत आहे. काही दिवसांपुर्वी  मुंबईचे भाजपाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी दहीहंडीपर्यंत न्यायालयाने घातलेल्या नियमांमध्ये बदल न झाल्यास राज्य सरकारकडून विशेष अध्यादेश काढला जाईल असं आश्वासन देणार ट्विट केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, आयुक्त आणि अधिवक्ता यांची गणेशोत्सव, दहीहंडी संदर्भात बैठक पार पडली होती. त्यानंतर आशिष शेलार यांनी ही माहिती दिली होती. 
 
विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान न्यायालयाने आशिष शेलार यांना सल्ला दिला आहे. आशिष शेलारांनी यापुढे दहिहंडीच्या कार्यक्रमाला जाताना विशेष काळजी घ्यावी असा सल्लाच न्यायालयाकडून देण्यात आला. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर अनेक गोविंदा पथके सरावाला सुरुवात करणार आहेत. गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय ठोस उपाययोजना केलेल्या आहेत, त्याचं लेखी स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून मागवलं आहे.
 
दहीहंडीच्या उंचीची मर्यादा २० फूट ठेवावी आणि १८ वर्षांखालील गोविंदांना मानवी मनोऱ्यात सहभागी करून घेऊ नयेत, असे स्पष्ट आदेश असतानाही २०१५ मध्ये दहीहंडी उत्सवात ठिकठिकाणी गोविंदा पथकं व आयोजकांकडून आदेश भंग झाला. म्हणून त्याविरोधात स्वाती पाटील यांनी न्यायालयीन अवमानाची याचिका दाखल केली आहे. 
 
ठाण्यात दहीहंडी सरावाचा गुरुपौर्णिमेचा मुहूर्त कोर्टाच्या दाव्याने हुकला
दहीहंडी उत्सवाचा सराव अनेक गोविंदा पथक हे परंपरेनुसार गुरूपौर्णिमेच्या दिवशीच सुरू करतात. ठाणे शहरात छोटी मोठी अशी ५००च्या आसपास गोविंदा पथक आहेत. परंतु दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने आणलेल्या बंधनामुळे काही गोविंदा पथकांनी उत्सवात सहभागी होणे बंद केले. यंदा शहरात अंदाजे ३५०च्या आसपास गोविंदा पथके उतरणार असली तरी बहुतांश गोविंदा पथके सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यानंतरच सरावाला सुरुवात करणार आहेत.