शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘जंकफूड’ म्हणजे काय रे भाऊ?

By admin | Updated: March 26, 2017 02:53 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठातून जंकफूड हद्दपार करण्याचा निर्णय २०१६च्या

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठातून जंकफूड हद्दपार करण्याचा निर्णय २०१६च्या नोव्हेंबर महिन्यात घेतला. तसे आदेशही पुढे पाठविण्यात आले. मात्र, जंकफूड म्हणजे काय, याची व्याख्याच स्पष्ट नसल्याने नेमक्या कोणत्या खाद्य पदार्थांवर बंदी घालावी, असा पेच राज्याच्या शिक्षण विभागासमोर आहे. यामुळे खाद्यपदार्थांच्या बंदीबाबतचा कोणताही आदेश राज्य शासनाने जारी केला नसल्याची लेखी कबुली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली. यूजीसीने जंकफूडवर घातलेली बंदी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली. मात्र, अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत जंकफूडची कोणतीही व्याख्या नाही. त्यामुळे जंकफूड म्हणून कोणत्याही अन्न पदार्थावर बंदी घालण्याबाबत शासनाने कोणताही आदेश निर्गमित केला नसल्याचा खुलासा तावडे यांनी केला. जास्त कॅलरी व कमी पोषणमूल्य असणाऱ्या खाद्यपदार्थांना साधारणपणे जंकफूड मानले जाते, मात्र त्याची स्पष्टता नसल्याचे ते म्हणाले.राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या उपाहारगृहातून जंकफूड हद्दपार करण्याबाबतचा निर्णय यूजीसीने गेल्या वर्षी घेतला. त्याबाबतचे पत्र यूजीसीने राज्याच्या शिक्षण विभागाला पाठविले. पण, जंकफूडची व्याख्याच नसल्याने बंदीचा आदेश सरकारला जारी करता आला नाही. (प्रतिनिधी)कोकाकोला आणि पेप्सिकोविरुद्ध खटलेबाटलीबंद पाण्याच्या विक्रीसाठी दोन वेगवेगळ्या किमती छापल्याबद्दल हिंदुस्थान कोकाकोला, पेप्सिको इंडिया होल्डिंग आणि युरेका फोर्ब्स या कंपन्यांविरुद्ध २२ खटले दाखल करण्यात आले आहेत. तर, शीतपेयांवर वेगवेगळे दर छापल्याबद्दल रेडबुल इंडियाविरुद्ध २ खटले नोंदविण्यात आल्याचा खुलासा मंत्री गिरीश बापट यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केला.