शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
2
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
3
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
4
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
5
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
6
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
7
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
8
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
9
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
10
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
11
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
12
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
13
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
14
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
15
टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!
16
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
17
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
18
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
19
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
20
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."

बँकांचे हे चालले तरी काय?

By admin | Updated: July 9, 2014 00:59 IST

बदलत्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुखता या दोन गोष्टींसंदर्भात ‘बॅकिंग’ क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा दावा बँकांकडून मोठ्या

ग्राहकांची नाराजी : वर्षभरात ७६ हजार तर दिवसाला २०८ तक्रारीनागपूर : बदलत्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुखता या दोन गोष्टींसंदर्भात ‘बॅकिंग’ क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा दावा बँकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु तरीदेखील बँकांसंदर्भात ग्राहक असमाधानी असल्याची बाब समोर आली आहे. बँकाच्या कार्यपद्धतीविरुद्ध ग्राहकांनी थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडेच दाद मागितली आहे. गेल्या वर्षभरात संपूर्ण देशातील बँकांच्या कार्यप्रणालीवर असमाधानी असलेल्या ग्राहकांकडून भारतीय रिझर्व्ह बँकेला ७६ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत बँकिंग लोकपालमध्ये बँकांशी संबंधित किती तक्रारी आल्या होत्या यासंदर्भात विचारणा केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक सेवा विभागाच्या मुख्य जनसूचना अधिकारी डी.जी.काळे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत १५ बँकिंग लोकपाल कार्यालयात एकूण ७६ हजार ६१ तक्रारी प्राप्त झाल्या. जर प्रत्येक दिवसाची आकडेवारी काढली तर रिझर्व्ह बँकेला प्रतिदिवशी सरासरी २०८ तक्रारी प्राप्त होत आहेत.देशभरातील १९९ बँकांविरुद्ध या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यात अगदी राष्ट्रीयीकृत बँकांपासून ते ग्रामीण सहकारी बँकांचादेखील समावेश आहे. काही बँकांविरुद्ध अवघी एक तक्रार असून अनेक बँकांविरुद्ध हजारो तक्रारी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या १९९ बँकांच्या यादीत नामवंत बँकांचीदेखील नावे आहेत.(प्रतिनिधी)