शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
3
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
4
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
5
अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."
6
कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती
7
Vaishnavi Hagawane Death Case : फरार काळात मटणावर ताव, हगवणे पिता -पुत्राचा फरार काळातील सीसीटीव्ही आला समोर
8
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
9
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
10
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
11
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
12
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
13
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
14
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
15
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
16
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
17
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
18
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
19
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
20
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक

स्वातंत्र्य दिन म्हणजे काय रे मित्रा..?

By admin | Updated: August 15, 2016 03:13 IST

देशाच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणारे मेसेज, फोटोज आणि व्हीडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

देशाच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणारे मेसेज, फोटोज आणि व्हीडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषत: तरूणाईकडून या पोस्ट शेअर होत असून हजारो लाईक्सही मिळत आहेत. मात्र एखादी पोस्ट कॉपी पेस्ट करताना त्यामागील इतिहास किंवा प्राथमिक माहिती तरूणाई घेते का? हे जाणून घेण्यासाठी ह्यलोकमतह्णने महाविद्यालयात शिकणाऱ्या युवा मंडळीला काही शालेय स्तरावरील प्रश्न विचारले. मात्र ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरेच देता आली नाही. बहुतेक विद्यार्थ्यांनी खूप धक्कादायक, आश्चर्यकारक आणि मजेशीर उत्तरे दिली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे विद्यार्थी म्हणजे आजच्या तरूणाईचे प्रातिनिधीक स्वरूप आहे. त्यामुळे या चुकीच्या उत्तरांसाठी केवळ या तरूणाईला दोषी ठरवून चालणार नाही. तर त्यांच्या चुकीच्या उत्तरांमधून आपल्या शिक्षणव्यवस्थेचा उथळपणा स्पष्ट होतो. आणि विद्यार्थ्यांचे पालकही या परिस्थितीसाठी तितकेच जबाबदार आहेत, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. माध्यम म्हणून ह्यलोकमतह्णने हसत-खेळत तरूणाईला अंतर्मुख करायला लावणारा हा प्रयोग केला आहे. त्यामुळे ह्यआपल्या देशाचा इतिहास केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न ठेवता, तो आपल्या मनात, रक्तात आणि श्वासात सदैव जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूह्ण ही शपथ यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला नक्कीच घेऊ....>विद्यार्थ्याचे नाव - हितेश आखाडेकॉलेज - महर्षी दयानंद महाविद्यालय वर्ष - टी. वाय. बी. एससीभारताचे पहिले पंतप्रधान कोण?- पंडीत जवाहरलाल नेहरु.भारताची राज्यघटना कोणी लिहिली? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि १८ सदस्यांनी लिहिली. १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी यामध्ये काय फरक आहे?- १५ आॅगस्टला स्वतंत्र मिळाले, २६ जानेवारी १९४९ ला संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली.भारत स्वतंत्र कधी झाला?- १५ आॅगस्ट १९४७ >विद्यार्थीनीचे नाव - ऐश्वर्या शेडगेकॉलेज - महर्षी दयानंद महाविद्यालयवर्ष - टी. वाय. बी. एभारताचे पहिले पंतप्रधान कोण?-पंडीत जवाहरलाल नेहरु.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?- नो आयडिया.... सरदार वल्लभ भाई पटेल.राज्यघटना कोणी लिहिली? - ड्राफ्टिंग कमिटी आणि बाबासाहेब यांचे आर्किटेक्चर होते.१५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी यामध्ये काय फरक आहे?- २६ जानेवारीला आपल्याला कॉन्स्टिट्युशन भेटले. १५ आॅगस्टला आपल्याला आझादी भेटली. >विद्यार्थिनीचे नाव -शिवानी मनवालकॉलेज - डहाणुकर महाविद्यालयवर्ष - एफ. वाय. बी. कॉम.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?- अब्दुल कलाम.भारताचे पहिले पंतप्रधान कोण?उत्तर- माहित नाही.भारताची राज्यघटना कोणी लिहिली? - मला नाही माहिती.पहिली महिला राष्ट्रपती कोण?- प्रतिभाताई पाटिल.>विद्यार्थ्याचे नाव - यश बनेकॉलेज - अल्फा कनिष्ठ महाविद्यालयवर्ष - एस.वाय.जे.सी.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?- माहित नाही.भारताचे पहिले पंतप्रधान कोण?- माहित नाही.भारताची राज्यघटना कोणी लिहिली? - माहित नाही.१५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी यामध्ये फरक काय आहे?- माहित नाही.भारत देश स्वतंत्र कधी झाला- माहित नाही.>विद्यार्थीनीचे नाव - मनाली रेवडेकरकॉलेज - महर्षी दयानंद महाविद्यालय वर्ष - एस. वाय. बी. कॉम.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? - अअअअ.... माहित नाही.पहिली भारतीय महिला अंतराळ कोण?- कल्पना चावला.भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?- माहिती नाही.भारताचे पहिले पंतप्रधान कोण?- माहित नाही.भारत स्वतंत्र कधी झाला?उत्तर- १५ आॅगस्ट १९४७.