शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बाबूरावांचा सवाल, आपल्या घराला किल्ल्याचे नाव दिले तर?

By अतुल कुलकर्णी | Updated: January 16, 2022 08:09 IST

मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय झाल्याची बातमी बाबूरावांनी वाचली आणि तत्काळ सौं.ना आवाज दिला, ‘अहो, ऐकलं का...? मी काय म्हणतोय, आपण आपल्याही घराला एखाद्या किल्ल्याचं नाव द्यायचं का..?’

- अतुल कुलकर्णी

मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय झाल्याची बातमी बाबूरावांनी वाचली आणि तत्काळ सौं.ना आवाज दिला, ‘अहो, ऐकलं का...? मी काय म्हणतोय, आपण आपल्याही घराला एखाद्या किल्ल्याचं नाव द्यायचं का..?’ तेव्हा किचनमधून आवाज आला... ‘हे काय नवीन खूळ काढलंय सकाळी सकाळी...! तुमच्याच पूज्य पिताजींचं नाव घराला असताना कशाला पाहिजे किल्ल्याचं नाव? छत्रपती शिवाजी महाराजांनी लढून, दिवसरात्र एक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली... त्यासाठी किल्ले मिळवले. तुम्ही या घरासाठी कर्ज घेतलंय. त्याचे हप्ते भरायचे म्हणून मला साडीसुद्धा आणत नाही कधी... मोठे आले घराला किल्ल्याचं नाव देणारे...! चूपचाप चहा प्या आणि कप द्या धुवायला... सौं.चा चढलेला पारा पाहून मनातल्या मनात बाबूरावांनी ठरवून टाकले की, या महिन्यात घराचा हप्ता नाही भरला तरी चालेल; पण हिला एक कांजीवरम आणूनच देऊ... तिचीदेखील हौस भागली पाहिजे... असा विचार करीत बाबूरावांनी वर्तमानपत्रातली तीच बातमी पुन्हा वाचायला घेतली.त्यांचं मन स्वत:च्या घराची आणि मंत्र्यांच्या बंगल्यांची तुलना करू लागलं... आपलं घर बँकेकडे तारण आहे... मंत्र्यांचा बंगला सरकारच्या मालकीचा आहे..! आपल्या डोक्यावर भलंमोठं कर्ज आहे... सरकारच्या डोक्यावरही आपल्यापेक्षा कितीतरी पट जास्त कर्ज आहे..! आपण हप्ते भरून भरून थकतो... सरकारही हप्ते भरून भरून थकत असेल; पण ते दाखवत नाही..! आपल्याला हप्ता चुकला की दुसऱ्या महिन्यात पगारही पुरत नाही... सरकारचे हप्ते थकले की ते लोकांचे दोन-दोन महिने पगारच देत नाही..! (परवाच नाही का ते एस.टी.वाले संपकरी सांगत होते, आम्हाला दोन-दोन महिने पगार मिळत नाही म्हणून...) जर का एवढं साम्य असेल तर जे सरकारला जमू शकतं ते आपल्या घरच्या ‘सरकार’ना का पटत नाही? हिंमत करून बाबूरावांनी पुन्हा एकदा सौं.ना आवाज दिलाच. ‘अहो मंडळी, मी काय म्हणतोय... आपल्याला फक्त नाव तर द्यायचंय... सरकारनं दिलं तसं... तुम्हाला काय हरकत आहे... आपणही आपल्या घराला देऊन टाकू एखाद्या किल्ल्याचं नाव. त्यात काय एवढं...?’ ते ऐकताच गॅस बंद करून एका हातात लाटणं घेऊन, कमरेवर हात ठेवत सौ. हॉलमध्ये आल्या. ‘अहो, जनाची नाही तर नाही, निदान मनाची तरी बाळगा... महाराजांनी मेहनतीने मिळवलेले गडकिल्ले, कधी गेलात का स्वत:च्या पोराला दाखवायला...? कधी सांगितला त्यांचा इतिहास समजावून त्याला...? तुम्ही तरी एखाद्या किल्ल्याचा अभ्यास केला कधी...? मोठे आले बोलायला... तुम्ही काय आणि तुमचं सरकार काय... आकंठ कर्जात बुडालेलं... तुम्ही घरात नको ते रंगीतसंगीत पाणी पिता, अभक्ष्य भक्षण करता... घराला किल्ल्याचे नाव दिल्यावर त्याचं पावित्र्य कोणी राखायचं? तुमच्याने ते होणार आहे का..? सूर्य मावळला की तुमचे हात थरथरतात... असे म्हणत सौ. एक किलिंग कटाक्ष टाकून किचनमध्ये गेल्या... ‘किल्ल्यांचं पावित्र्य जपता येणार आहे का तुम्हाला...?’ हा सवाल बाबूरावांना अस्वस्थ करू लागला. त्यांनी पुन्हा मंत्र्यांचे बंगले, त्यात राहणारे मंत्री, त्यांचे गुण-अवगुण आणि पावित्र्य यांची मनातल्या मनात तुलना करणं सुरू केलं...