शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डाळ दर नियंत्रक कायद्याचे काय झाले?

By admin | Updated: April 12, 2017 02:23 IST

राज्यातील डाळीच्या व्यवस्थापनात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची, तसेच ग्राहकांची सरकारने घोर फसवणूक केल्याचे स्पष्ट झल्याची

मुंबई : राज्यातील डाळीच्या व्यवस्थापनात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची, तसेच ग्राहकांची सरकारने घोर फसवणूक केल्याचे स्पष्ट झल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना सावंत म्हणाले की, डाळीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने तुरीचे उत्पादन वाढल्यावर हमी भावाने तूर खरेदी करणे अपेक्षित होते, पण सरकारच्या आशीर्वादाने व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले आणि सरकारनेही खरेदीसाठी हात आखडते घेतले. राज्यात बारदाना आणि गोदामे उपलब्ध नाहीत, अशी तकलादू कारणे दिली जात आहेत. आता पणनमंत्र्यांनी अगोदर खरेदी केलेल्या तुरीची मोजणी होत नाही, तोपर्यंत नवीन खरेदी करू नये, असे फर्मान काढल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.सुमारे साडेचार हजार कोटींचा डाळ घोटाळा या सरकारने केला होता. असंतोष निर्माण झाल्यानंतर डाळ दर नियंत्रक कायदा आणू, अशी घोषणा सरकारने केली. केंद्राकडे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी या कायद्याचे प्रारूप पाठविल्यावर त्यावर केंद्रातर्फे देशाच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण खात्यातर्फे या कायद्याचा तीव्र शब्दांत विरोध झाला, असे सावंत म्हणाले. डाळ दरनियंत्रक कायद्याबाबात सरकारने तत्काळ स्पष्टीकरण द्यावे. बंद तूर खरेदी तत्काळ सुरू करावी, गोदामे नसतील, तर तूर ही डाळीच्या रूपात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत स्वस्त दरात जनतेला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)