नागपूर : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका गावात पाण्याचा टँकर सुरू झाला नाही म्हणून सरपंचाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे सरकार साधे पिण्याचे पाणी देऊ शकत नाही तर काय कामाचे असले सरकार? असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केला आणि उद्याच्या उद्या त्या गावाला पाण्याचा टँकर सुरू करा असा आदेश अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना द्यावे लागले. औचित्याच्या मुद्यावर पवार बोलताना म्हणाले, अध्यक्षांच्याच जिल्ह्यातले हे गाव आहे. टँकर लावण्याचे अधिकार तहसीलदारांना द्या असे आम्ही ओरडून सांगतोय पण कोणावरही त्याचा परिणाम होत नाही. (प्रतिनिधी)
पाणी न देणारे सरकार काय कामाचे?
By admin | Updated: December 19, 2015 03:21 IST