शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सर्वेक्षणावरील खर्चाचे काय ?

By admin | Updated: November 16, 2014 01:00 IST

मराठा आरक्षणासाठी प्रदीर्घ काळापासून होत असलेली मागणी निवडणुकीच्या वर्षात गत आघाडी सरकारने मान्य केली खरी, पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. मात्र आरक्षण लागू करण्यापूर्वी मराठा

देयके ५५ लाखांची : शासनाने दिले १० लाखचंद्रशेखर बोबडे - नागपूरमराठा आरक्षणासाठी प्रदीर्घ काळापासून होत असलेली मागणी निवडणुकीच्या वर्षात गत आघाडी सरकारने मान्य केली खरी, पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. मात्र आरक्षण लागू करण्यापूर्वी मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती अद्यापही पूर्णपणे करण्यात आली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी गत आघाडी सरकारवर पक्षांतर्गतच दबाव असल्याने व निवडणुकीचे वर्ष असल्याने तत्काळ पावले उचलण्यात आली. राणे समिती गठित करून तातडीने मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये एक बैठक झाली व प्रत्येक जिल्ह्यात तत्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातही यंत्रणा राबली. सर्वेक्षणासाठी एका दिवसात लाखो फॉर्मची छपाई करण्यात आली. इतर स्टेशनरीवरही खर्च करण्यात आला. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रगणक व सर्वेक्षकांच्या नियुक्त्या करून कामकाजाला सुरुवात करण्यात आली होती. या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठ्यांना १६ टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याला स्थगिती मिळाली असली तरी या सर्वेक्षणावर झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती जिल्हा प्रशासनाला झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जाची छपाई, छायांकित प्रती काढण्यासाठी झालेला खर्च, प्रगणक व सर्वेक्षकांचा खर्च आदीपोटी जिल्हा प्रशासनाने ५५ लाखाची देयके शासनाकडे पाठविली होती. त्यापैकी अलीकडेच फक्त १० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या तुटपुंज्या रकमेतून कोणाचे देयक अदा करायचे आणि कोणाला थांबवायचे असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. प्राप्त माहितीनुसार अर्जांच्या छपाईचेच देयक ५ लाख ५० हजार रुपयांवर आहे तर तेवढेच देयक छायांकित प्रतीसाठी झालेल्या खर्चाचे आहे. प्रगणक व सर्वेक्षकांच्या मानधनाचा यात समावेश नाही. त्यांनाही त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. आता तर आरक्षणाला न्यायालयानेच स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळात शिल्लक रक्कम शासन केव्हा अदा करेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीड हजारावर प्रमाणपत्रांचे वाटपगत आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण लागू करण्याची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत सेतू केंद्राकडे जात प्रमाणपत्रासाठी आलेल्या सरासरी १२०० ते १५०० अर्जाचा निपटारा करण्यात आल्याची माहिती आहे. नेमका आकडा कळू शकला नाही. पण यात मराठा समाजातील अर्जाचा समावेश अधिक होता. मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या आदेशाला स्थगिती दिली असली तरी आतापर्यंत जारी केलेल्या प्रमाणपत्रांवर याचा परिणाम होणार नाही हे येथे उल्लेखनीय.