शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कधी काय घडेल, कोणी सांगावे या धरतीवर!

By admin | Updated: July 5, 2015 02:41 IST

बारामती, खंडाळा तालुक्यात काश्मीरसारखी बर्फाची चादर, दर महिन्याला अवकाळी पाऊस, चक्रीवादळसदृश वादळी वारे हे चित्र गेल्या सहा महिन्यांत दक्षिण महाराष्ट्राने कमी-अधिक प्रमाणात अनुभवले आहे.

- चंद्रकांत कित्तुरे

बारामती, खंडाळा तालुक्यात काश्मीरसारखी बर्फाची चादर, दर महिन्याला अवकाळी पाऊस, चक्रीवादळसदृश वादळी वारे हे चित्र गेल्या सहा महिन्यांत दक्षिण महाराष्ट्राने कमी-अधिक प्रमाणात अनुभवले आहे. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांचा हा परिणाम टाळता न येणारा आणि कधी काय घडेल याचा अंदाजही न देणारा. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर हे पाच जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले. प्रचंड नैसर्गिक, भौगोलिक विविधता असलेला हा प्रदेश. यातील कोल्हापूर जिल्हा दुष्काळापासून कोसो दूर. सांगलीतील खानापूर, आटपाडी हे तालुके कायमचे दुष्काळी छायेतले. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि खंडाळा तालुक्यांतील परिस्थितीही जवळपास अशीच. हे तालुके वगळता हे दोन्ही जिल्हे निसर्गसंपन्न; पण या निसर्गसंपन्नतेवर मानवाचे होत असलेले अतिक्रमण त्याचा समतोल ढळण्यास कारणीभूत ठरत आहे. मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, जागतिक तापमानात होणारी वाढ याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. हवामानात अचानक बदल होत आहेत. त्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे.पश्चिम महाराष्ट्रात यंदा दर महिन्याला पाऊस झाला आहे. बारमाही पाऊस होण्याचे हे इतिहासातील पहिलेच वर्ष असावे. निसर्गाच्या असमतोलामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून असे घडले असल्याचे सांगितले जाते. यंदा उन्हाळ्यात देशाच्या अन्य भागात उष्णतेची लाट असताना या जिल्ह्यात मात्र तापमानाची सरासरीही गाठली गेली नाही. वार्षिक सरासरीपेक्षा ते सुमारे दोन अंशानी कमीच राहिले. याला कारण दर महिन्याला हवामानात बदल होऊन झालेला पाऊसच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर यंदाच्या अवकाळी पावसाची सरासरी ही पावसाळ्यातील सरासरीपेक्षा जास्त आहे. कोल्हापूरचे तापमान कमाल ४२, तर किमान ७ अंश सेंटिग्रेड इतके, तर सरासरी ३८ अंश सेंटिग्रेड असते. यंदा मात्र जिल्ह्यातील तापमानाने पस्तिशी ओलांडलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात असणारी वनराई आणि वर्षभराचा पाऊस यामुळे येथील लोकांना उन्हाळा सुसह्य झाला. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सातारा, सांगली जिल्ह्यांतीलही आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुके वगळता तापमानाची वार्षिक सरासरी कमीच राहिलेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, इंदापूर हे तालुके आणि बारामती तालुक्याचा काही भाग दुष्काळी पट्ट्यात मोडतो. यंदा गारपीट अनेक ठिकाणी झाली असली, तरी बारामती, पुरंदर, दौंड आणि खेड तालुके तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील गारपीट काश्मीरचा अनुभव देणारी होती. सर्वत्र बर्फाची चादर पसरल्यासारख्या गारा पडल्या होत्या. गारांचा आकारही मोठा होता. या गारपिटीचा शेतातील उभ्या पिकांना मोठा फटका बसून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.बदलते पाऊसमान आणि हवामानाचा परिणाम शेतीवर खूप मोठा झाला आहे. कोणती पिके घ्यावीत याचा फेरविचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याचे परिणाम १९९२मध्ये रिओ येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत तज्ज्ञांनी सांगितले होते. मात्र, ते हसण्यावारी नेण्यात आले. आज त्याची सत्यता अनुभवास येत आहे. सरकारने दूरगामी विचार करून आपली धोरणे ठरविली पाहिजेत. त्यात समाजाबरोबरच पर्यावरण संतुलनाचाही विचार झाला पाहिजे, अन्यथा भविष्यात याहून गंभीर नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागेल.- डॉ. जय सामंत, पर्यावरण तज्ज्ञ, कोल्हापूर